Corona speeds up in the city ... 70 more patients 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोनाला भलताच वेग...आणखी 70 रुग्णांची भर 

विनायक लांडे

नगर : जिल्ह्यात काही केल्या कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही. उपाययोजनांची अंमलबजावणी असू, की सुरक्षित राहण्याचे आवाहन कोरोना व्हायरस कशालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना मीटरही भलत्याच वेगाने फिरू लागले आहे. आज आणखी 70 रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या 2262वर पोचली आहे. 

जिल्हा रुग्णालयात आज दुुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार संगमनेर 24, नगर तालुका 23, नगर शहर 13, श्रीगोंदे पाच, श्रीरामपूर तीन, पारनेर, राहुरी प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना मीटर शंभरी पार करीत आहे. त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे, तर प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. सध्या 925 जणांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या बळींचा आकडा 46वर पोचला आहे. 

आणखी 58 जण डिस्चार्ज 
कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली, तरी कोरोनामुक्तांची संख्येलाही वेग आला आहे. कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्या आजअखेर 1291 घरात पोचली आहे. आज जिल्ह्यातील तब्बल 58 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 
यात संगमनेर 16, पाथर्डी 14, नगर तालुका, श्रीगोंदे प्रत्येकी सहा, नगर शहर, भिंगार प्रत्येकी पाच, जामखेड तीन, श्रीरामपूर दोन, राहाता तालुक्‍यातील एकाचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

Hapus Mango Price : आंबाप्रेमींसाठी मोठी बातमी! हवामानातील बदलामुळे हापूसच्या दरात मोठी घसरण; बाजारात काय आहेत ताजे भाव?

CSK vs SRH Live: संजू सॅमसन 'फसला', उर्विल पटेलचा आडवा फटका हुकला... पॅट कमिन्सच्या डावपेचांनी चेन्नईला 'पॉवर' दाखवली... Video

Mandwa Gateway Ferry Suspension: पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान मांडवा-गेटवे जलवाहतूक पूर्णपणे बंद

Jayant Patil Petrol Price Statement : 'पेट्रोल 130 रुपयांवर जाईल, देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती...'; आमदार जयंत पाटील यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT