sangeet bari 
अहिल्यानगर

नाद केला पण अंगलट आला, नगर झेडपीतील अधिकारी गेले दौऱ्याला, पोहोचले बारीला

दौलत झावरे

नगर ः नाद करायचा नाय, अशा आशयाचं गाणं आहे तरी लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या नादाला लागतात. जिल्हा परिषदेच्या अशाच एका अधिकाऱ्याने नाद केला पण तो त्यांच्या अंगलट आला.

त्याचे झाले असे ः नगर जिल्ह्याच्या दक्षिणेतील एका तालुक्यात ते दौऱ्याला गेले. तेथे त्यांनी थेट बारी गाठली. तेथे त्यांनी ताल धरला त्यामुळे सोबतचेही बेताल झाले. रात्रीचा हा कुटाणा सकाळी सगळीकडे व्हायरल झाला. 

जिल्हा परिषदेतील एका विभागात प्रभारी म्हणून कामकाज करीत असलेले अधिकारी नुकतेच एका तालुक्‍याच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्याबरोबर कार्यालयातील काही जण सोबत होते. कामकाज आटोपल्यानंतर ते नगरकडे परत येत असताना, त्यांना "छमछम' पाहण्याचा मोह आवरता आला नाही. बराच वेळ त्यांची मैफल रंगली. त्यांनी एका गाण्यावर ठेकाही धरला.

ठेका धरलेल्या अवस्थेत त्यांचे मोबाईलवर फोटोसेशन झाले. हे प्रभारी अधिकारी नगरला पोचताच, रात्री ठेका धरलेले त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याची गंभीर दखल घेत, प्रशासनाने त्यांच्याकडील प्रभारी पदभार काढून घेतला.

या अधिकाऱ्यासोबत असणाऱ्यांचीही प्रशासनाकडून चौकशी सुरू झाली आहे. गुप्त पद्धतीने ही चौकशी सुरू आहे. 
दरम्यान, दौऱ्यावरून परत येताना संबंधित अधिकाऱ्यांना "छमछम' केंद्रावर कोणी नेले, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

या पूर्वीही असे प्रकार घडले असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाने चौकशी समिती नेमून या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. 

फोटो काढणारा कोण? 
गाण्यावर ठेका धरलेला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोटो काढणारा कोण, याचा शोध ठेका धरणाऱ्यांसह इतर कर्मचारीही घेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT