custody sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : अल्पवयीन मुलीला पळविल्याप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

४ जुलै रोजी फुस लावुन अमिष दाखवुन मुलीला बेलापुरातुन पळवुन नेले होते

गौरव साळुंके

श्रीरामपूर, (जि. अहमदनगर) : तालुक्यातील बेलापूर येथील अल्पवयीन मुलीसह तिच्यासोबत असलेल्या बेपत्ता तरुणाला पकडण्यात पोलिसांना एक महिन्यानंतर यश आले. असून येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी आयुब सिकंदर शेख (वय २०, रा. बेलापुर) याला पुढील पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी दिली.

दरम्यान, सदर अल्पवयीन मुलीला आज (रविवारी) तीच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असून २४ जुलै रोजी तीला फुस लावुन अमिष दाखवुन बेलापुरातुन पळवुन नेले होते. त्यानंतर तिच्या आईच्या फिर्यादीवरुन वरील आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार पोलिसांकडुन दोघांचा शोध सुरु होता. मात्र संबधीत आरोपी मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेण्यात पोलीसांना अडथळा येत होता. मुलीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस ठाण्यात मोर्चा काढुन श्रीरामपूर व बेलापूर बंद पुकरला होता. तर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेलापूरात रास्तारोको आंदोलन करुन निषेध नोंदविला होता.

अखेर पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे येथील रेल्वे स्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीसह आरोपी आयुब शेख याला काल (शनिवारी) ताब्यात घेतले होते. त्यानंतर आरोपीला आज येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले. असता न्यायालयाने पुढील पाच दिवस आरोपीला पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले असून सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील अधिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wardha: दोन दुचाकींचा भीषण अपघात, तीन ठार;देवळी- पुलगाव रस्त्यावरील घटना; मृतांच्या भावी स्वप्नांचा चुराडा

Wardha: वर्धा नदीत पाच जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत; सेल्फी ठरली अखेरची स्मृती, घुग्घुस शहरावर शोककळा

Petrol-Diesel-CNG Price: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर कच्चे तेल महागले; आता पेट्रोल-डिझेल कितीला? महाराष्ट्रातील शहरनिहाय नवे दर जाहीर

विदर्भात मॉन्सून कधी पोहोचणार? पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Titan Success Story: टायटनच्या यशाचा खरा हीरो! TIDCO च्या एका निर्णयाने आज दिली 1 लाख कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT