उद्धवजी होश में आओ, लोकांचे शाप घेऊ नका - चंद्रकांत पाटील

हे सरकार ठोकल्याशिवाय, कॉलर पकडल्याशिवाय न्याय द्यायला तयार नाही
Chandrakant Patil
Chandrakant PatilGoogle
Updated on

पुणे: "कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर (corona first wave) मंदिर सुरु करण्यासाठी संघर्ष (temple opening) करावा लागला. भाजपाने राज्याभरात घंटानाद आंदोलन केलं. हजारो ठिकाणी मंदिरांसमोर घंटानाद (ghantanad protest) झाला. हे सरकार ठोकल्याशिवाय, कॉलर पकडल्याशिवाय न्याय द्यायला तयार नाही" अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पुण्यात कसबा गणपतीच्या मंदिराच्याबाहेर शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी आज शंखनाद आंदोलन केलं.

"महापुरात मदत द्यायला तयार नाही. कोल्हापुरात हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले. आता मदत देतील, तसचं राज्यात हजारो मंदिरांसमोर घंटानाद झाल्यावर मंदिर उघडण्याची परवानगी दिली" असे चंद्रकांत पाटील म्हणाले. "दुसरी लाट भीषण होती. कोरोनात काळजी घेण्याबाबत दुमत नाही. आम्ही तुम्हाला सहकार्य करणार. सगळे लॉकडाउनचे नियम पाळतो. पण लॉकडाउनचे नियम सगळ्यांना सारखे असले पाहिजेत. किराणा मालाची दुकानं सुरु करण्यापूर्वी दारु घरोघरी पोहोचवायला सुरुवात केली. दारु घरी पोहोचवणं राज्याचं अधिकृत धोरण कसं असू शकतं? तुमची नीती तीच आहे. तुम्हाला त्यातून पैसे मिळवायचे आहेत" अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

Chandrakant Patil
नारायण राणे आज पोलिसांसमोर हजर राहणार का?

"कोरोनाची लाट ओसरली आहे. लाट ओसरली नसेल, तर काहीच सुरु करु नका. व्यापाऱ्यांना आंदोलन केल्यानंतर व्यापार सुरु करता आला. बरोबरच्या दोन जणांना खूश करण्यासाठी मंदिरं उघडलेली नाहीत" असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केली. "ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मंदिरं उघडली नाही, तर रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा दिलाय. एकदिवस मंदिर उघडा हजारोच्या संख्येने रांगा लागतील. नरसोबाच्या वाडीला लाखो लोक येतात. याही वेळा निर्बंध असूनही ४० हजार लोक आले. एवढे लोक कसे आले? दर्शनाचं व्यक्तीस्वातंत्र्य नाही का?" असा सवाल केला.

Chandrakant Patil
नारायण राणेंकडून पश्चिम बंगालचा अपमान; संजय राऊतांची टीका

"दोन वर्ष वारी नाही म्हणजे काय? वारकऱ्यांना विचारा. आज संपूर्ण महाराष्ट्रात शंखनाद आंदोलन सुरु आहे. यांना दारुच्या दुकानांचा आवाज ऐकू येतो" अशी टीका पाटील यांनी केली. "मंदिर उघडली नाही, तर लोक आपल्या भावना दाबून ठेऊ शकणार नाही. मंदिराची कुलूप तोडली जातील. मंदिरात जायचं तर मातोश्रीत जायच का? नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही" असे पाटील म्हणाले. संध्याकाळी ऑर्डर काढा. आजपूसन प्रवेश सुरु करा. दर्शनानंतरच आंदोलनाची सांगता होईल, असे पाटील म्हणाले. "उद्धवजी होश में आओ, होश में आओ, लोकांचे शाप घेऊ नका" असे पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Latest Marathi News Live Update
Shaurya Chakra for Satara Officer Who Led Mission Eliminating Nine Militants
Admission Confusion to End as Maharashtra Sets Up District-Level Student Help Centers
Maharashtra Class 4 Shivaji Maharaj history update
Marathi News Esakal
www.esakal.com