court sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : बायोडिझेल गुन्ह्यातील आठ आरोपींची जामिनासाठी धाव

कोतवाली पोलिस आणि जिल्हा पुरवठा विभागाने ता. 22 ऑक्‍टोंबर रोजी बाह्य वळण रस्त्यावर केडगावात छापा टाकला होता.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - शहरातील बाह्यवळण रस्त्यावरील ढाब्यांवर बेकायदेशीर बायोडिझेलची ट्रक चालकांना विक्री करणाऱ्या गुन्ह्यातील सात आरोपींना अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी सुरू आहे.

कोतवाली पोलिस आणि जिल्हा पुरवठा विभागाने ता. 22 ऑक्‍टोंबर रोजी बाह्य वळण रस्त्यावर केडगावात छापा टाकला होता. बेकायदेशीर बायोडिझेल विकणाऱ्यांना अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुतेंसह अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली.

आरोपी विक्रांत वसंत शिंदे यांनी ऍड. सतीशचंद्र सुद्रिक यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे. शिवसेना शहर प्रमुख व आरोपी दिलीप सातपुते यांनी ऍड. सतीश गुगळे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आरोपी मयूर बडे, महेंद्र कोळेकर, कुणाल नरसिंधानी, रोशन माखिजा, विशाल रमेश भांबरे यांनी ऍड. महेश तवले, ऍड. संजय दुशिंग, ऍड. विक्रांत शिंदे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केले आहेत. या जामिन अर्जावर शनिवारी (ता. 27) सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: ''पंतप्रधान मोदींच्या एका फोनमुळे युद्ध थांबू शकतं'', UAE राजदूत हुसैन मिर्झा यांनी व्यक्ती केली अपेक्षा

Jalkot News : पं. स. सभापतीपदी काँग्रेसच्या सुनिता कोसबे तर उपसभापती माधव वाघमारे यांची निवड

‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स ; जाणून घ्या संपूर्ण कास्ट

Latest Marathi News Live Update : उरुळी कांचन येथे अपघात, एकाचा मृत्यू

Udgir News : उदगीरच्या सभापतीपदी वनमाला मरलापल्ले तर उपसभापती पदी बापुसाहेब भोसले

SCROLL FOR NEXT