अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला ठोठावली सक्तमजुरी | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punishment of a criminal abuses a minor girl

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला ठोठावली सक्तमजुरी | Ahmednagar

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपी सचिन तुळशीराम शिकारे (वय 28, धनगरवाडी, ता. नगर) याला विनयभंग, पोक्‍सो (POCSO) कलमान्वये दोषी धरून न्यायालयाने एक वर्षे सक्तमजुरी व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

तसेच याच गुन्ह्यातील आरोपी विकास तुळशीराम शिकारे, सुभद्रा तुळशीराम शिकारे (दोघे रा. धनगरवाडी, ता. नगर) यांना मारहाण केल्याप्रकरणी दोषी धरून प्रत्येकी एक हजार रूपये दंड, सुभद्रा शिकारे हिला भादंवि कलम 504 प्रमाणे दोषी धरून पाचशे रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी ही शिक्षा ठोठावली आहे.

हेही वाचा: शाळेला जाण्याची जीवघेणी धडपड... ST बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल

मुलीच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी

अल्पवयीन मुलगी ता. 29 ऑगस्ट 2018 रोजी विद्यालयात जाण्यासाठी बसस्थानकावर उभी असताना सचिन शिकारे याने तिचा हात धरून छेड काढली होती. मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर सचिनच्या घरी ते गेले. तेथे असलेल्या विकास व सुभद्रा शिकारे यांनी मुलीसह तिच्या आई-वडिलांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक एस. आर. गोरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयासमोर आलेले साक्षी-पुरावे, सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्यधरून न्यायालयाने आरोपींना दोषी धरून शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. मनिषा पी. केळगंद्रे- शिंदे यांनी काम पाहिले.

हेही वाचा: अहमदनगर : शहरातील अनधिकृत फ्लेक्‍स बोर्डने घेतला तरुणाचा बळी

loading image
go to top