Ex-serviceman beaten in Sangamner taluka 
अहिल्यानगर

वादात मध्यस्थी केल्याने माजी सैनिकाला बेदम मारहाण

आनंद गायकवाड

संगमनेर ः चुलत भावाशी झालेल्या वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून माजी सैनिकाला बेदम मारहाण केली. त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांनाही मारहाण केल्याची घटना तालुक्यातील निमज येथे मंगळवार ( ता. 19 ) रोजी घडली.

या बाबत बुधवारी (ता. 20) संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास कासार व फिर्यादीचा चुलतभाऊ भाऊसाहेब रामभाऊ कासार यांच्यात सोमवार ( ता. 18 ) रोजी झालेल्या वादात, सेवानिवृत्त सैनिक पोपट चिमाजी कासार ( वय 45 रा. निमज ) यांनी मध्यस्थी केली होती.

या वादातून मंगळवारी विलास कासार याने गैरकायद्याची मंडळी जमवून, रामभाऊचा मुलगा गोकुळ व त्याच्या पत्नीला मारहाण करीत असताना, त्या ठिकाणी पोपट कासार त्यांच्या मुलीला दुचाकीवर कॉलेजहून घेवून आले. त्यांना पाहताच आरोपींनी पोपट कासार यांची दुचाकी ढकलून देत, त्यांना हातातील फायटर, व लाकडी काठ्यांनी डोके, हात पायावर जबर मारहाण केली.

त्यांना सोडवण्यासाठी मध्ये आलेली मुलगी सुप्रिया, पत्नी मंदा व आई वडिलांनाही धक्काबुक्की करीत मारहाण केली. या घटनेत जबर मार लागल्याने पोपट कासार जखमी झाले. हे सर्व जण संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या प्रकरणी पोपट कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुलशन भरत कातोरे कुसुम गुलशन कातोरे, विलास बाच्छाव कासार, शकुंतला बाच्छव कासार, मीना विलास कासार, बाच्छाव बाबुराव कासार (सर्व राहणार निमज ता. संगमनेर) तसेच बाळू उत्तम दिघे यांचा मुलगा (नाव माहीत नाही) रा. कोल्हेवाडी तसेच इतर 6 ते 7 अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न तसेच सशस्त्र जमावाने दंगा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार करीत आहेत.
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीटच्या वादातून रक्तरंजित हल्ला; प्रवाशाच्या पोटात चाकू खुपसला, मुंबई लोकलमध्ये काय घडलं?

IND vs AFG 1st ODI : यशस्वी जैस्वालला संधी नाहीच! पहिल्या वन डे साठी भारताची प्लेइंग इलेव्हन; हार्दिकच्या जागी कोण? रोहितसोबत सलामीला...

स्कार्फ बांधलेल्या बाईने स्वप्नीलला ओळखलं अन् मागून येऊन... 'मुंबई पुणे मुंबई'च्या शूटिंग दरम्यान तुळशीबागेत काय घडलेले?

आजपासून 'टी-२० विश्वकरंडकाचा' थरार! भारतात टीव्ही आणि मोबाईलवर 'फ्री' मॅच कशी पाहायची? जाणून घ्या संपूर्ण शेड्युल आणि टाईम टेबल

Supreme Court Verdict : काँग्रेसला धक्का! मीनाक्षी नटराजन यांना 'सर्वोच्च' दणका; राज्यसभा उमेदवारी अर्ज फेटाळण्याविरोधातील याचिका केली नामंजूर

SCROLL FOR NEXT