Excessive rain in "Ya" mandals of "Punarvasu" ... The fortunes of Shivara brightened 
अहिल्यानगर

"पुनर्वसू'ची "या' मंडलांत अतिवृष्टी... शिवाराचे भाग्य उजाळले 

विनायक लांडे

नगर ः पावसाने काल (मंगळवारी) पुनर्वसू नक्षत्रात जिल्ह्यात 97 पैकी 92 महसूल मंडलांत सर्वदूर हजेरी लावली. चिचोंडी पाटील, मिरी, एरंडगाव या तीन ठिकाणी अतिवृष्टीही झाली. रोहिणी, मृग, आर्द्रा पाठोपाठ पुनर्वसू नक्षत्राच्या सरीदेखील जिल्ह्याच्या शिवारावर कृपावंत झाल्या आहेत. पुनर्वसू नक्षत्राने खरिपाच्या पिकाला संजीवनी देत शिवाराचे भाग्य उजाळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचा लढा सुरू आहे. नागरी जीवन विस्कळीत झालेले असताना शेतकरी मात्र खरिपाच्या पूर्वमशागतीत व्यस्त होता. जूनच्या मुहूर्तावर जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राच्या दमदार धारा बरसल्या. त्यापाठोपाठ सात जूनला मृग नक्षत्राचा आरंभ झाला. मात्र, पहिले चार दिवस विसावा घेतलेला मृग नक्षत्राने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. त्यानंतर जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीने वेग घेतला. पावसामुळे जिल्ह्यात यंदा शंभर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खरिपाची पेरणी झाली. त्यानंतर आर्द्रा, पुनर्वसू नक्षत्राने जिल्ह्यात खरिपाच्या पिकाला बळ दिले. 

"या' मंडलांत खाते निरंक 
विरगाव 
समशेरपूर 
ब्राम्हणवाडा 
कोपरगाव 
दहिगाव 

"या' मंडलांत अतिवृष्टी 
चिचोंडी पाटील 67.3 
एरंडगाव 104.8 
मिरी 77.5 
(मिलिमीटरमध्ये) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education Policy : राज्यात शिक्षक संचमान्यतेचे नवे निकष लागू; भविष्यातील शिक्षक भरतीवर टांगती तलवार, हजारो शिक्षकांची पदे होणार कमी!

Ola-Uber Strike: ओला-उबर चालकांनी संप पुकारला! मनमानी भाडेवाढीविरोधात रस्त्यावर उतरणार; पण कधी? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींचा 'परीक्षा पे चर्चा' मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

Shambhuraj Desai : 'आम्ही इकडून तिकडे उड्या मारल्या नसत्या, तर तुम्ही मंत्री तरी झाला असता का?' शंभूराज देसाईंचा कोणावर निशाणा?

BMC: दोन्ही शिवसेना शेजारी? ठाकरेंच्या कार्यालयातील ३० टक्के जागा काँग्रेसला

SCROLL FOR NEXT