Rashin again two patient 
अहिल्यानगर

राशीनमध्ये एकाच कुटुंबात पाचजण बाधित

सकाळ वृत्तसेवा

राशीन : शुक्रवारी (ता.२९) पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घरातील काल (३०) दोघाजणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. असतानाच आज पुन्हा त्याच कुटुंबातील आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने राशीनकरांचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत.

पहिल्या बाधित सहा वर्षीय मुलीला आज डिस्चार्ज देण्यात आला. आज पुन्हा दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे. आता तरी प्रशासन झोपेच्या सोंगातून बाहेर येणार का हा प्रश्नच आहे. राशीन ते पुणे आणि पुणे ते राशीन असा प्रवास केलेल्या रुग्णानंतर त्याची चौदा वर्षीय मुलगी, ऐंशी वर्षीय वडील, दुसरी मुलगी व मुलगा यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला  आहे. त्यामुळे हे रुग्ण राहत असलेल्या भाग हॉटस्पॉट झाला आहे.

या भागातील अनेक घरात भीतीचे वातावरण आहे. या रुग्णाच्या कुटुंबाशेजारील सर्वच कुटुंब संस्थात्मक विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक आहे. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी दाटीवाटीची वसाहत असल्याने होम क्वारंटाईन करून येथे उपयोग होणार नाही. 

राशीनकरांसाठी कोरोनाचे पाच रुग्ण सापडल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. आता लोकांनी स्वयंशिस्त पाळली  आणि प्रशासनाने उपाययोजना केल्या तरच कोरोनाची साखळी तुटेल. राशीनकरांनी सोशल डिस्टन्स पाळून सॅनिटायझरचा वापर करणे आजची गरज बनली आहे. 

या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आम्ही शोध घेत आहोत. संबंधिताना संस्थात्मक विलगीकरण कक्षात क्वारांटाईन करण्यात येईल.

डॉ. दिलीप व्हरकटे, राशीन
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Deploys 12 Nuclear Warheads: दुनियावालों हमें बचाओ! भारताने इतिहासात पहिल्यांदाच गोदामातून काढले १२ अणुबॉम्ब; पाकची भीतीने गाळण

नुकताच साजरा केला वाढदिवस; किती वर्षांची झाली तेजश्री प्रधान? फोटो शेअर करत सांगितलं स्वतःचं खरं वय

IND vs AFG: उद्यापासून वन-डेचा थरार! टीव्ही अन् मोबाईलवर LIVE मॅच कधी, कुठे पाहायची? जाणून घ्या वेळ

Kalyan: निर्दयीपणाचा कळस! जन्मानंतर अवघ्या सहा दिवसांतच चिमुकलीला कचऱ्यात टाकलं; कल्याणमध्ये हृदयद्रावक घटना

१.७ लाखांचा पगार... तरी महिनाअखेर खात्यात उरतात फक्त २,५२० रुपये; प्रत्येक मध्यमवर्गीयाने वाचावी अशी गोष्ट

SCROLL FOR NEXT