
उपमुख्यमंत्री अजित पवार त्या शेतकऱ्याला पाण्याबाबत सल्ला देतात. या मोबाईल संभाषणाची क्लिप चांगलीच व्हायरल होते आहे. कुकडीचे आवर्तन लांबल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. टेल टू हेड असा पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला आहे. परंतु श्रीगोंदेकरांनी अगोदर आम्हाला पाणी द्या नंतर कर्जतला अशी भूमिका घेतली आहे.
श्रीगोंदे : धरणातील पाणी सोडण्याबाबतच्या आंदोलकांच्या मागणीमुळे अजित पवार यांनी मागे एकदा वक्तव्य केले होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा काहींनी गैरफायदा घेत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपला सडेतोड बाणा काही बदलला नाही. आताही कुकडीच्या पाण्याबाबत आंदोलनाने जोर धरला आहे. तिकडे कर्जत तालुक्यात माजी मंत्री राम शिंदे उपोषण करणार आहेत. श्रीगोंद्यातही आमदार बबनराव पाचपुते यांनी रान पेटवण्यास सुरूवात केली आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकरी आवर्तन लांबल्याने अस्वस्थ आहेत.
"' मी अजित पवार बोलतोय बोला..... दादा मी पिंपळगाव पिसे (श्रीगोंदे) येथून मारुती भापकर बोलतो. कुकडीचे पाणी सोडायला सांगा ना.. पिके जळायला लागली... थांबा थांबा मी त्या खात्याचा मंत्री नाही. जयंत पाटील यांना सांगा, मी कुठल्याही वरिष्ठ मंत्र्यांच्या कामाता लूडबूड करीत नाही. तुम्ही राहूल जगताप यांना सांगा, ते बोलतील जयंतरावांशी. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे ना...
ही फोनवरची चर्चा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार व श्रीगोंद्यातील शेतकरी मारुती भापकर यांच्यामधील. त्याची अॉडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
हेही वाचा - रोहित पवार -राम शिंदे आले एकत्र
लुक्यातील पिंपळगावपिसे (खरातवाडी) येथील भापकर हे शेतकरी आहेत. त्यांनी कुकडीच्या पाण्यासाठी थेट अजित पवार यांनाच फोन केला. फोनच्या सुरवातीलाच भापकर यांनी ते माजी आमदार राहूल जगताप यांच्या गावाशेजारच्या गावातून बोलत आहेत. कुकडीचे पाणी अजून पंधरा दिवस येणार नाही हे सोडायला सांगा ना, पिके जळायला लागली असल्याची खंत मांडू लागले.
त्याचवेळी पवार यांनी त्यांना थांबवित सांगितले की, मी त्या खात्याचा मंत्री नाही. जंयतराव झाले, छगन भुजबळ झाले, हे पदांनी माझ्यापेक्षा सिनीअर मंत्री आहेत. त्यांच्या कामात मी हस्तक्षेप करीत नाही. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे ना. होणार असले तरच हो म्हणणार. तुम्ही राहूल जगताप यांना सांगा... ते बोलतील जंयतरावांशी. आपणही बोलून घ्या..
असा सल्ला अजित पवार त्या शेतकऱ्याला देतात. या मोबाईल संभाषणाची क्लिप चांगलीच व्हायरल होते आहे. कुकडीचे आवर्तन लांबल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. टेल टू हेड असा पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला आहे. परंतु श्रीगोंदेकरांनी अगोदर आम्हाला पाणी द्या नंतर कर्जतला अशी भूमिका घेतली आहे.