foundation of pre primary school online education ahmednagar
foundation of pre primary school online education ahmednagar sakal
अहमदनगर

पूर्वप्राथमिकचा पाया ऑनलाइनमध्ये पक्का

दौलत झावरे

अहमदनगर : लहान मुलांचा शारीरिक व मानसिक असा सर्वांगीण विकास होणे, खेळातून शिक्षणाची गोडी लागणे, यासाठी आवश्‍यक असलेले पूर्वप्राथमिकचे ऑफलाइन पद्धतीचे शिक्षण कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. ऑनलाइन पद्धतीने ते दिले जात आहे. अंगणवाडी सेविकांच्या कष्टामुळे पूर्वप्राथमिकचा पाया पक्का आहे. विशेष म्हणजे या विभागाने कोरोनाच्या कठीण परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आले होते. त्याबरोबरच पूर्वप्राथमिक शाळाही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत; परंतु ऑनलाइन अध्यापन सुरू ठेवलेले होते. सुरवातीच्या काळात ऑनलाइन अध्यापनात अनेक अडचणी आल्या, मात्र आता त्याची सवय पालकांसह विद्यार्थ्यांना होऊ लागलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. आता पूर्वप्राथमिकचे वर्गही सुरू करण्याचे नियोजन सुरू झालेले आहे. त्यामुळे पूर्वप्राथमिकमध्ये शिकणाऱ्या तीन ते सहा वर्षे वयोगटातील एक लाख ७२ हजार १०५ विद्यार्थी दोन वर्षांनंतर शाळेत दाखल होणार आहेत.

तीन ते सहा वर्षांचे विद्यार्थी

अकोले ः ७३८२, राजूर ः ४४६१, संगमनेर ः ४६१३, घारगाव-१ ः ६९६६, घारगाव-२ ः ६०८४, श्रीगोंदे ः ६४४२, बेलवंडी ः ५१८५, कर्जत ः १०७७३, शेवगाव ः ११३२३, पाथर्डी ः ९८९६, जामखेड ः ७१५३, पारनेर ः ११३९२, कोपरगाव ः १०५७९, राहाता ः १२०१३, श्रीरामपूर ः ८७५४, राहुरी ः ११३१७, नेवासे ः ९१०३, वडाळा ः ८३१५, नगर ग्रामीण ः ४२९२, नगर-दोन ः ९२९८, भिंगार ः ६७६४.

आकडे बोलतात

मंजूर पदे (कंसात कार्यरत)

  • २१ (१०) बालविकास प्रकल्प अधिकारी

  • १९२ (१३७) अंगणवाडी पर्यवेक्षिका

  • ४८०१ (४६३४) ः अंगणवाडी सेविका

  • ८३३ (७५०) मिनी अंगणवाडी सेविका

  • ४८०१ (४२०२) अंगणवाडी मदतनीस

रिक्त पदे

  • १० ः बालविकास प्रकल्प अधिकारी

  • ५५ ः अंगणवाडी पर्यवेक्षिका

  • १३७ ः अंगणवाडी सेविका

  • ८३ ः मिनी अंगणवाडी सेविका

  • ५९९ ः अंगणवाडी मदतनीस

पूर्वप्राथमिक ऑफलाइन होणार

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले पूर्वप्राथमिक शिक्षण आता सुरू करण्याच्या हालचाली होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा व महाविद्यालये सुरू झाली असून, आता पूर्वप्राथमिक शिक्षण सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. एक मार्चनंतर पूर्वप्राथमिक शिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे.

समाजमाध्यमाच्या साह्याने पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेण्यात आलेला आहे. समाजमाध्यमावर ग्रुप तयार करून त्यावर व्हिडिओ पाठवून विद्यार्थ्यांकडून धडे गिरवून घेण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. समाजमाध्यमातूनही गुणवत्तेचा आलेख कायम ठेवलेला आहे.

- मनोज ससे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग

कोरोना काळात सर्व दैनंदिन कामांबरोबरच आरोग्य विभागाला अंगणवाडी सेविकांनी मोलाची मदत केलेली आहे. ही सर्व कामे करताना अंगणवाडीतील विद्यार्थ्यांकडून व्हिडिओच्या माध्यमातून धडे गिरवून घेऊन अंगणवाडी सेविकांनी चांगले काम केले आहे.

- मीरा शेटे, सभापती, महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद

अंगणवाड्यांचा लेखाजोखा

  • ५६३४ ः एकूण अंगणवाड्या

  • ४८०१ ः अंगणवाड्या

  • ८३३ ः मिनी अंगणवाड्या

कोरोना काळातील कामगिरी

  • वजन व उंची मोजमाप

  • शालेय पोषणआहाराचे वाटप

  • कुपोषित बालकांना अंगणवाडीत आहार देणे

  • व्हिडिओच्या माध्यमातून धडे देणे

    ८६४ पदे रिक्त

जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मिनी सेविका आदींची एकूण ८६४ पदे रिक्त असतानाही या विभागाने कोरोना संकटात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT