Good news ... the number of coronamuktas has finally reached the house of thirteen hundred 
अहिल्यानगर

खुशखबर...कोरोमुक्तांची संख्या आजअखेर पोचली तेराशेच्या घरात ! 

विनायक लांडे

नगर ः कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली, तरी कोरोनामुक्तांची संख्येलाही वेग आला आहे. कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्या आजअखेर तेराशेच्या घरात पोचली आहे. जिल्ह्यातील तब्बल 58 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 

नगरमध्ये कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यात मोलाचे योगदान आहे. योग्य उपचार व रुग्णांची काळजी घेतल्याने दोन वर्षांच्या बाळासह 90 वर्षांच्या वृद्धांनीही, आपणही कोरोनाला हरवू शकतो, हे दाखवून दिले आहे. आज एकाचवेळी 58 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 1291पर्यंत पोचली आहे. यात संगमनेर 16, पाथर्डी 14, नगर तालुका, श्रीगोंदे प्रत्येकी सहा, नगर शहर, कॅन्टोंमेंट प्रत्येकी पाच, जामखेड तीन, श्रीरामपूर दोन, राहाता तालुक्‍यातील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा  आकडा 2192 पर्यंत पोचला आहे. दुसरीकडे कोरोमुक्तांची संख्याही कमालीची वाढत असल्याने जिल्हावासियांसाठी ही खुशखबर आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

Hapus Mango Price : आंबाप्रेमींसाठी मोठी बातमी! हवामानातील बदलामुळे हापूसच्या दरात मोठी घसरण; बाजारात काय आहेत ताजे भाव?

CSK vs SRH Live: संजू सॅमसन 'फसला', उर्विल पटेलचा आडवा फटका हुकला... पॅट कमिन्सच्या डावपेचांनी चेन्नईला 'पॉवर' दाखवली... Video

Mandwa Gateway Ferry Suspension: पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान मांडवा-गेटवे जलवाहतूक पूर्णपणे बंद

Jayant Patil Petrol Price Statement : 'पेट्रोल 130 रुपयांवर जाईल, देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती...'; आमदार जयंत पाटील यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT