He has now started working in the education department 
अहिल्यानगर

"बांधकाम'मधून "त्याचे'  बस्तान शिक्षण विभागात 

दौलत झावरे

नगर ः जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांना संगणकज्ञान नसल्याने त्यांनी वैयक्तिक व्यक्तींना नेमले आहे. प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवर वचक कमी झाल्यामुळेच हा प्रकार सुरू असल्याचे दिसते. सामान्य प्रशासनासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

जिल्हा परिषदेत काही खासगी व्यक्तींकडून कर्मचारी कामकाज करून घेत आहेत. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, स्थायी व बांधकाम विभागाच्या सभेतही या विषयावर चर्चा झाली.

पदाधिकाऱ्यांनी अशा व्यक्तींचा बंदोबस्त करून संबंधितांवर कारवाईची सूचना प्रशासनाला केली. मात्र, प्रशासनाच्या बोटचेप्या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे. 

बांधकाम विभागातील "त्या' व्यक्तीने आता शिक्षण विभागात बस्तान बसविले आहे. कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून तो काम करीत असल्याने, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. खासगी व्यक्तीच्या नियुक्तीवरून बांधकाम विभागातील तीन कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाने नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

मात्र, अद्याप त्यांनी खुलासा व कार्यकारी अधिकाऱ्यांचा त्यावरील अभिप्राय सादर केलेला नाही. त्यामुळे खासगी व्यक्तीच्या नियुक्तीला संबंधित अधिकाऱ्यांचीही साथ असल्याची चर्चा आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच आता चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

विशेष म्हणजे, बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांपेक्षा खासगी व्यक्तीला ठेकेदार सर्वाधिक ओळखतात. तोच प्रत्येक ठेकेदाराची ऊठ-बस करीत असतो.  

                                                 संपादन ः भाऊसाहेब काळोखे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! तीन आठवडे चालणार यंदाचं पावसाळी अधिवेशन, २२ जूनपासून होणार सुरुवात, कोणते मुद्दे राहणार चर्चेत?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

पाकिस्तानी हवाई दलाचं विमान कोसळलं, २ पायलटचा मृत्यू; घटना CCTVत कैद

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

SCROLL FOR NEXT