प्रशासनाच्या इशार्यानंतर बॅंक बंदचा निर्णय

दौलत झावरे
Thursday, 9 July 2020

गांधी मैदान परिसर प्रशासनाने बफर झोन म्हणून जाहीर केलेला असतानाही, तेथे बॅंकेचे कामकाज सुरू होते. बॅंकेत पदाधिकारी निवडीच्या बैठका होऊन, जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडप्रक्रिया झाली. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॅंकेच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर सत्कार सोहळाही पार पडला.

नगर : शहरातील गांधी मैदान परिसर बफर झोन असताना, तेथील ऐक्‍य मंदिरात प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या बैठका झाल्या. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा रंगल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. प्रशासनाने त्याची दखल घेत, बॅंकेत जाऊन चौकशी केली. बफर झोन असेपर्यंत बॅंकेचे कामकाज बंद ठेवण्याची सूचना बॅंक व्यवस्थापनाला केली. 

हेही वाचा ः संगमेरात कोरोनाने घेतले एक डझन बळी

शहरातील गांधी मैदान परिसर प्रशासनाने बफर झोन म्हणून जाहीर केलेला असतानाही, तेथे बॅंकेचे कामकाज सुरू होते. बॅंकेत पदाधिकारी निवडीच्या बैठका होऊन, जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडप्रक्रिया झाली. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॅंकेच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर सत्कार सोहळाही पार पडला.

अवश्य वाचा ः चापडगाव शिवारात लूट, दोघांना अटक

पोलिस आल्यानंतर सर्वांची पळापळ झाली. याबाबत "सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने दखल घेत आज बॅंकेत जाऊन चौकशी केली. बॅंकेत गेल्या तीन दिवसांपासून गर्दी होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मुकुंद देवगावकर यांनी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

चितळे रस्ता परिसर बफर झोनमध्ये आल्यामुळे बॅंकेचे दैनंदिन व्यवहार 17 जुलैपर्यंत बंद व पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बॅंक व्यवस्थापनाने घेतला आहे. फक्त ऑनलाइन व्यवहार सुरू राहतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे यांनी सांगितले.  

बॅंकेतील व परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर बॅंकेत कितीजण आले होते, हे स्पष्ट होईल. त्यामुळे प्रशासनाने बॅंकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

                                                          संपादन ः दौलत झावरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The decision to close the bank after the warning of the administration