Husband wife along with child killed Samruddhi Highway Accident six injured police hospital ahmednagar sakal
अहिल्यानगर

Accident News : समृद्धी महामार्गावर अपघात; पती-पत्नीसह चिमुकली ठार, सहा जण जखमी

कारची टेम्पोला धडक; पती व चिमुकली जागेवर मृत झाले, तर पत्नीचे उपचारादरम्यान निधन

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : समृद्धी महामार्गावर टेम्पोला कारने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह दीड वर्षाची मुलगी ठार झाली.

अपघातात इतर सहा जण जखमी झाले आहेत. पती व चिमुकली जागेवर मृत झाले, तर पत्नीचे उपचारादरम्यान निधन झाले. गुरुवारी (ता. ३०) मध्यरात्री एकच्या सुमारास अपघात झाला.

संतोष अशोक राठोड (वय ३५), वर्षा संतोष राठोड (३५), अवनी संतोष राठोड (दीड वर्ष, रा. गोसावी पांगरी, ता. मंठा, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत. शरद शिवाजी पवार (वय ३६, रा. ककडा भानू नाईक तांडा, पो. नेर, जि. जालना),

एजाज सिराज पठाण (वय २४, रा. लोणार, ता. लोणार, जि. जालना), बलीबाई अशोक राठोड (५०), कृष्णा अशोक राठोड (२७), कोमल कृष्णा राठोड (१९, गोसावी पांगरी, ता. मंठा, जि. जालना), नितीन राम पवार (२८, रा. मंठा, जि. जालना) अशी जखमींची नावे आहेत.

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कुटुंबीय जालना येथून विरार (मुंबई) येथे जात होते. कोकमठाण शिवारात समृद्धी महामार्गावरून जात असताना त्यांच्या कारने (एमएच २२ एच २५२३) पुढे चाललेल्या टेम्पोला (एमएच २०, सीटी ६६५६) मागून जोराची धडक दिली.

याप्रकरणी टेम्पोचे चालक पांडुरंग राजू पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार रणजित तुकाराम राठोड (३२, रा. महोदरी, ता. मंठा, जि. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघ २ बदलांसह उतरणार; झिम्बाब्वेविरुद्धच्या Playing XI मध्ये स्टार खेळाडू परतले, कोणाचा पत्ता झाला कट ?

Indian Railways Digital Initiative : भारतीय रेल्वेने उचललं मोठं डिजिटल पाऊल!, ‘रेल टेक पोर्टल’ अन् ‘ई-आरसीटी’ प्रणाली सुरू

Latest Marathi News Live Update : पुढच्या वेळी आदित्य ठाकरेंना दावोसला नेतो - फडणवीस

SCROLL FOR NEXT