Jalasamadhi to one in Jayakwadi 
अहिल्यानगर

जायकवाडीत एकाला जलसमाधी

सचिन सातपुते

शेवगाव  : जायकवाडी धरणात मासेमारीसाठी गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज सकाळी हा प्रकार समोर आला. सुंदरहरी बंडू पवार (वय 55, रा. ढोरसडे) असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. 

ढोरसडे परिसरातील जायकवाडी धरणात काल (मंगळवारी) मासे पकडण्यासाठी पवार व त्यांचे नातेवाईक गेले होते. थर्माकोलपासून बनवलेल्या छोट्या चप्पूवर बसून ते मासेमारी करीत होते. 

काल सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे धरणात मोठमोठ्या लाटा उसळून थर्माकोल चप्पू उलटून पवार पाण्यात पडले.

दोन नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. त्यामुळे काठावर येऊन त्यांनी इतर नातेवाइकांना ही घटना सांगितली. 

उपसरपंच माऊली निमसे यांनी पोलिस प्रशासन व तहसीलदारांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली.

मात्र, तरी ते सापडले नाहीत. आज सकाळी नातेवाइकांनी मासे पकडण्याचे जाळे टाकून जलाशयात त्यांचा शोध घेतला. बऱ्याच प्रयत्नांनंतर पवार यांचा मृतदेह जाळ्यात अडकला. त्यांच्या मागे पत्नी, चार मुलगे, चार मुली असा परिवार आहे.  

                                                          संपादन ः दाैलत झावरे

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

नाद खुळा...! वैभव सूर्यवंशीचा झंझावात अविश्वसनीय Catch ने रोखला, RCB च्या कर्णधाराचा Video तुफान व्हायरल झाला

Trump-Afghanistan: तालिबानची ट्रम्प यांना 1,000,000,000,000 डॉलरची ऑफर! बदल्यात ठेवली 'ही' मोठी अट

Chhatrapati Sambhajinagar Karj Mukt Yojana: कर्जमुक्ती समितीकडील १२३ तक्रारींचा निपटारा; जिल्हाभरात ८४, ५१५ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण

Marathi News Live Updates : माहिममध्ये भाजप-मनसे आमनेसामने, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT