Kopargaon has benefited from the storm 
अहिल्यानगर

वादळामुळे नाशिकमध्ये वाताहत पण कोपरगावला झालाय हा फायदा

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : महाराष्ट्रात वादळाने चांगलाच तडाखा दिला आहे. या वादळामुळे शेतकऱ्यांसह उद्योजकांनाही मोठा फटका बसला. परंतु या वादळाचा कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

मुंबईकडून नाशिक जिल्ह्याकडे चक्रीवादळाचा प्रवास सुरू झाल्यानंतर नाशिक शहरात व परिसरात संतत पावसाची धार सुरू होती. त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. नाशिक जिल्ह्यतील हा बंधारा भरल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे.

सकाळी आठ वाजता 16 हजार 250 क्यूसेस तर सकाळी दहा वाजता 3155 क्यूसेस वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले होते. चालू वर्षी गोदावरी नदीला प्रथमच पाणी सोडण्यात आल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून गोदावरी नदी कोरडी ठाक आहे. वाळू तस्करी करणाऱ्यांनी वाळू उचलल्याने नदीमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये हे सोडलेले पाणी मुरून जाणार आहे. परंतु पावसाळ्याच्या तोंडावर नांदूर मधमेश्वर बंधारा भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.कारण हा बंधारा भरण्यासाठीही मोठा पाणीसाठा लागतो. परंतु वादळी पावसामुळे बंधाऱ्यातून पाणी सोडले आहे. आगामी पाऊस काळात पाणी सोडताना नदीपात्रात अपव्यय होणार नाही. त्यामुळे हे पाणी जरी नदीपात्रात मुरले ती कोपरगाव औरंगाबादपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदवार्ता आहे.

वादळामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या लाभक्षेत्रात मुसळधार पाऊस काल संध्याकाळपासून सुरू होता. त्यातूनच नवीन पाण्याची आवक येण्यास सुरुवात झाल्याने नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामध्ये पाणी भरले. त्यामुळे गोदावरी पात्रात या पावसाळ्यात प्रथमच पाणी गोदावरी पात्रात झेपावले. सकाळी आठ वाजता असलेला विसर्ग कमी करून सकाळी दहा वाजेच्या सुमारास सदर विसर्ग 3155क्यूसेस केल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT