Leaders are targeting the district collectors to fill their houses: Bahirnath Wakle 
अहिल्यानगर

"यांची' घरे भरण्यासाठी नेत्यांकडून जिल्हाधिकारी लक्ष्य ः बहीरनाथ वाकळे

विनायक लांडे

नगर ः ""कोरोनाच्या संकटात जिल्हाधिकारी द्विवेदी दिवस-रात्र जनतेच्या हितासाठी झटत आहेत. त्यांना टार्गेट करीत बेपत्ता झालेले राजकारणी एकत्र येऊन नावे ठेवण्याचे काम करीत आहेत. मात्र, जनता हे अजिबात खपवून घेणार नाही. महापालिकेत राष्ट्रवादी, भाजप एकमेकांच्या पाठिंब्यावर सत्तेत आहेत. शहरातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. पुढाऱ्यांचा लॉकडाउनचा हट्ट पुरविण्याआधी सामान्यांच्या रोजगाराची, वेतनाची व उदरनिर्वाहाची नेत्यांनी सोय लावावी. सर्वसामान्यांना मार्चपासून 10 हजार रुपये मासिक उदरनिर्वाह भत्ता मिळवून द्यावा, असे आव्हान भाकपचे शहर सहसचिव बहीरनाथ वाकळे यांनी दिले आहे. 

पत्रकात वाकळे यांनी म्हटले आहे, की कोरोनाच्या संकटात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी कर्तव्यदक्षतेने जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, काही राजकीय नेत्यांकडून सर्वसामान्यांना संकटात टाकून, मोठ्या भांडवलदारांचे घर भरण्यासाठी लॉकडाउनचा आग्रह केला जात आहे. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना टार्गेट केले जाते. त्यापेक्षा पुढाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करून घ्यावी, तसेच लॉकडाउनची हौस असणाऱ्यांनी आधी सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाची सोय लावावी,'' अशा शब्दांत वाकळे यांनी टीका केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT