rohit pawar esakal
अहिल्यानगर

Karjat Election:भाजपविरुद्ध महाविकास आघाडीची लढत;कर्जतमध्ये २३१ अर्ज दाखल

आमदार रोहित पवार समर्थक विरुद्ध आमदार राम शिंदे समर्थक लढत होईल, अशी चर्चा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Karjat Election- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या १८ जागासाठी विक्रमी २३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीत राज्यात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी लढत होत. असताना येथे आशा लढती होणार कि वेगवेगळ्या चुली मांडल्या जाणार हे आगामी काळात कळेल.

मात्र आमदार रोहित पवार समर्थक विरुद्ध आमदार राम शिंदे समर्थक लढत होईल, अशी चर्चा आहे. याचे चित्र २० एप्रिलला अर्ज माघारीनंतर स्पष्ट होईल.

कर्जत तालुक्यातील सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून यात एकूण ३०० उमेदवारी अर्जाची विक्री झाली होती.

मात्र प्रत्यक्षात १८ जागेसाठी २३१ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.त्यापैकी सहकारी संस्था मतदार संघात ११ जागासाठी १२४ उमेदवारी अर्ज, ग्रामपंचायत मतदार संघाच्या ४ जागेसाठी ७७ उमेदवारी अर्ज,व्यापारी व आडते मतदार संघातील २ जागेसाठी १८ उमेदवारी अर्ज,व हमाल व मापाडी मतदार संघाच्या १ जागेसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या बाजार समितीच्या निवडणुकीत २हजार पाचशे पंच्याहत्तर मतदार आहेत.

बुधवारी ता ५ एप्रिलला अर्जाची छाननी होणार आहे. बदलते नियम व त्यास लागणारे कागदपत्रे यासाठी उमेदवारांची धावपळ झाली. आता छाननी करताना अधिकाऱ्यांची कसरत होण्याची शक्यता आहे.त्यानंतर २० एप्रिलपर्यंत माघार असून २१ एप्रिलला चिन्ह वाटप व २८ एप्रिल २०२३ रोजी मतदान होणार आहे. २९ ला मतमोजणी होणार आहे.

भाजपचे युवा नेते राजेंद्र देशमुख हे निवडणुकीपासून अलिप्त असल्याचे चित्र आहे. वीस ते बावीस संस्था त्यांना मानणाऱ्या आहेत. म्हणून ते ज्या बाजूला तिकडे निकाल झुकतो अशी चर्चा सुरू झाली आहे.

कर्जमध्ये घमासान

मागील निवडणुकीत माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी स्वपक्षीयसह विरोधकाची मोट बांधीत १८ पैकी १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले होते. मात्र या वेळेस आमदार रोहित पवार मैदानात असल्याने घमासान होणार यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Raigad Women : 'लाडकी बहीण' योजनेतून तब्बल 50 हजार महिलांची नावं वगळली; 'ही' आहेत महत्त्वाची कारणं, यादीत तुमचं तर नाव नाही ना?

Jalgoan News: २५ वर्षीय विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू, पिंपळनेरमध्ये नातेवाईकांचे आंदोलन, डॉक्टरांवर गंभीर आरोप

Gold Rate Today : सोन्याने घेतली उसळी तर चांदी घसरली ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Iran US Conflict: पश्चिम आशियातील तेल निर्यात रोखू; नाकेबंदीनंतर इराणचा इशारा, अमेरिकेच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT