Mahatma Phule Agricultural University will sell onion seeds online 
अहिल्यानगर

बातमी आहे शेतकऱ्यांबाबतची ः फुले कृषी विद्यापीठ यंदा कांदाबियाणे अॉनलाईन विकणार

सकाळ वृत्तसेवा

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदाबियाणे विक्रीसाठी 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. दर वर्षी पोलिस बंदोबस्तात कांदाबियाणे विक्री करावी लागते. मात्र, या वर्षी कोविड-19च्या संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठातर्फे ऑनलाइन बियाणेविक्री होणार आहे.

विद्यापीठाने विकसित केलेले खरीप कांद्याचे वाण "फुले समर्थ' व "बसवंत-780' या वाणांचे सत्यप्रत बियाणे राज्य सरकारच्या आदेशानुसार, तसेच कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन विकणार असल्याचे विद्यापीठाचे प्रमुख बियाणे शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी सांगितले. त्यासाठी उद्या (सोमवारी) सकाळी 10 वाजेनंतर बियाणे उपलब्ध असेपर्यंत विक्री करण्यात येणार आहे.

बियाण्यासाठी ऑनलाइन पेमेंट झाल्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना पुढील उपलब्धतेचे ठिकाण व वेळ मोबाईलवर कळविण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांनी https://www.phuleagromart.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्यासाठी नाव, आधार कार्ड, फोटो, तसेच 7/12 उतारा व पासपोर्ट फोटो आदी बाबी भराव्यात.

नोंदणीनंतर ओटीपीद्वारे लॉगिन केल्यावर प्रोफाईलमध्ये पत्ता अपडेट करावा. त्यात "सीड' ऑप्शनमध्ये कांदाबियाण्यात दोन प्रकार व त्याची माहिती दिसेल. त्यात पेमेंट ऑप्शनमध्ये जाऊन ऑनलाइन पेमेंट करायचे आहे. व्यवहार झाल्यावर ट्रान्झॅक्‍शन क्रमांक तपासून, पैसे भरल्याची पावती डाऊनलोड करता येईल. बियाणे किती तारखेस व कुठे उपलब्ध होईल, याची माहिती नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे दिली जाईल, अशी माहिती डॉ. सोळंके यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT