esakal | या आठवड्यात आहे तीन राशींच्या जातकांच्या नोकरीवर गदा
sakal

बोलून बातमी शोधा

This week there is a crisis in the jobs of three zodiac people

काहीजण आगामी काळात नोकरी कशी करता येईल, याचा विचार करीत आहेत. व्यापाऱ्यांना दुकाने कशी सुरू होतील, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

या आठवड्यात आहे तीन राशींच्या जातकांच्या नोकरीवर गदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः सध्या लॉकडाउनचा काळ आहे. बहुतांशी लोकांच्या नोकरीवर गदा आली आहे. मात्र, अनेक अत्यावश्यक सेवेतील लोक सध्या कामावर हजर आहेत. काहीजण आगामी काळात नोकरी कशी करता येईल, याचा विचार करीत आहेत. व्यापाऱ्यांना दुकाने कशी सुरू होतील, याची उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, या आठवड्यात राशीफलाचा विचार केला तर तीन राशीच्या व्यक्तींना नोकरीत संकट संभवते तर तीन राशीच्या जातकांना संसर्गाचा धोका आहे.


मेष - आर्थिक - किरकोळ आर्थिक लाभ होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. वडिलांच्या प्रकृतीवर खर्च संभवतो. अचानक खर्च उदभवण्याची शक्‍यता आहे. 
प्रेम - अग्नेय दिशेच्या व्यक्तीस होकार देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी एकत्र येण्याचा संभव आहे, परंतु रागावर नियंत्रण ठेवलेलेच बरे. हातून चुका होऊ देऊ नका. नऊ आणि दहा तारखा नोकरीत चांगल्या आहेत. उपाय - गणेश दर्शन घ्या. 
वृषभ - आर्थिक - अचानक धनलाभ होऊ शकेल. बुडीत येणे सप्ताहाच्या शेवटी वसूल होईल. 
प्रेम - जोडीदाराशी सांभाळून वागा. विनाकारण विसंवाद नको. वाद झाल्यास तुमची हार नक्की. पैसा व्यवस्थित सांभाळा. 
उपाय - शनिदर्शन घ्यावे. 
मिथुन - आर्थिक - धनलाभ शक्‍य होईल.. कुठल्याही नवीन उपक्रमाची सुरूवात करू नये. 
प्रेम - हा काळ विशेष सावधानी घेण्याचा आहे. कौटुंबिक सौख्य अल्प राहील. 
उपाय - शनि-मारीतेच दर्शन घ्यावे. स्वतःची विशेष काळजी घ्यावी. 
कर्क - आर्थिक - साप्ताहाच्या प्रारंभी व शेवटी किरकोळ आर्थिक लाभ संभवतात. कर्ज होऊ शकेल. खर्च वाढता राहील. 
प्रेम - कौटुंबिक सौख्य नाही. नोकरीत वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. त्यांच्याशी वाद टाळा. नोकरी सांभाळा. व्यावसायिकांनी जपून पाऊल टाका. 
उपाय - शिवउपासना फलदायी 
सिंह - आर्थिक - आर्थिक परिस्थिती जैसे थे राहील. व्यवसायात वृद्धी होईल. कौटुंबिक औषधावर खर्च. 
प्रेम - कौटुंबिक सौख्य मध्यम. जोडीदारास, उष्णतेचे विकार होऊ शकतात. 
उपाय - गणेश दर्शन घ्यावे. 
कन्या - आर्थिक - सप्ताह आळसात जाणार आहे. आर्थिक उलाढाल मध्यम राहील. 
प्रेम- नवीन ओळखी होतील. अंगात मीपणा कमी करावा. थोडे शांत रहा. पाण्यापासून जपून रहा. नोकरी, व्यवसाय सांभाळा. 
उपाय - कुलदेवतेचे दर्शन घ्या. फल मिळेल. 
तुला - आर्थिक - परिस्थिती उत्तम राहील. पैज जिंकू शकाल. मात्र, लॉटरी, सट्ट्यापासून जपून. 
प्रेम - कौटुंबिक सौख्य अल्प. कुरबुरी सुरूच राहतील. त्याचा झोपेवर परिणाम होईल. नोकरी व्यवसायात नको ते उपदव्याप मागे लागतील. 
उपाय - विष्णूसहस्त्रनाम, राम-कृष्ण उपासना करा. 
वृश्‍चिक - आर्थिक स्थिती बरी राहील. कौटुंबिक आरोग्यवर खर्च. संसर्ग टाळा. 
प्रेम - शांती कशी मिळेल याकडे लक्ष द्या. 
उपाय - शिवउपासना करा. 
धनु - आर्थिक - चिंता वाढतील. जुने येणे वसुलीस विलंब. धाडस करू नका. 
प्रेम - पत्नीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. संसर्गाचा धोका आहे. 
उपाय -सूर्य उपासना करा. 
मकर - आर्थिक - खर्च जपून करा. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. बुडण्याची जास्त शक्‍यता आहे. 
प्रेम - एखाद्या प्रकरणाचा शेवट होईल. वादात गुंतू नका. निद्रानाश संभवतो. डोक्‍यास इजा होऊ शकते. मणका सांभाळा. 
उपाय - कुलदेवतेचे दर्शन घ्या. 
कुंभ - आर्थिक -अडचणीत भर टाकणारा सप्ताह आहे. मागील गुंतवणुकीतून लाभ मिळेल. 
प्रेम - संपूर्ण सप्ताह आळसात जाईल. शैक्षणिक अडचणी जाणवतील. 
उपाय - कुलदेवतेचे दर्शन घ्यावे. 
मीन - आर्थिक - खर्च वाढतील. नोकरीतील अडचणीत वाढ शक्‍य. 
प्रेम - नको ते पराक्रम टाळा. डोक्‍याला इजा होण्याची शक्‍यता आहे. पाय घसरू देऊ नका. 
उपाय - गणेश दर्शन, उपासना करावी. 


 (ज्योतिष,वास्तूतज्ज्ञ प्रकाश कुलकर्णी)