nilesh lanke esakal
अहिल्यानगर

गोरगरिबांच्या पैशांवर काही पुढाऱ्यांची मजा - आ. नीलेश लंके

मार्तंड बुचुडे

पारनेर (जि.अहमदनगर) : गोरगरिबांच्या पतसंस्थेत असलेल्या ठेवींच्या जोरावर तालुक्यातील काही पुढाऱ्यांची मजा सुरू आहे. पतसंस्थेच्याच पैशातून गाड्या घेऊन फुशारक्या मारत ते फिरत आहेत. आता घराबाहेर येऊन ‘यांच्यामुळे कोरोना वाढतो,’ असे म्हणणारे कोरोनाच्या काळात दीड वर्ष कुठे गेले होते, असा सवाल आमदार नीलेश लंके (nilesh lanke) यांनी विरोधकांना करीत खरपूस समाचार घेतला.

मी समाजसेवा म्हणून राजकारण करत आहे - लंके
बाबुर्डी येथील विविध विकासकामांचा प्रारंभ व लोकार्पण प्रसंगी आमदार लंके बोलत होते.
या वेळी गावातील ५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच प्रकाश गुंड, बंडू साबळे, भाऊसाहेब भोगाडे, मोहन साबळे या वेळी उपस्थित होते. लंके म्हणाले, ‘‘विरोधकांकडे कार्यकर्ते शिल्लक राहिले नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, तरी सर्वपक्षीय माझ्या विरोधात उतरणार आहेत. विरोध फक्त गरिबांच्या पैशावर करत आहेत. मला राजकारणातून पैसे कमवायचे नाहीत किंवा कोणाच्या मालमत्ताही लुबाडायच्या नाहीत. मी समाजसेवा म्हणून राजकारण करत आहे. गावाच्या विकासात राजकारण आणता कामा नये, असेही लंके म्हणाले.


त्यांनाच निवडणुकीत उमेदवारी
जनतेची कामे केली तर जनता डोक्यावर घेऊन नाचते. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जो कार्यकर्ता जनतेच्या मनात आहे, त्यालाच उमेदवारी दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: उकाडा दूर होणार, मुंबईसह 'या' जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार; आएमडीचा सतर्कतेचा इशारा

Amravati: फ्रेजरपुरा हादरला! १३ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा गंभीर आरोप; अमरावतीत खळबळजनक घटना; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

रोज सकाळी फक्त १०० उड्या मारा; शरीरात दिसतील असे बदल की तुम्हीही थक्क व्हाल, यास्मिन कराचीवालांचा खुलासा

Light Bill Saving Tips : रात्रभर AC, फॅन चालवूनही वाढवणार नाही वीजबिल; वापरुन पाहा 'या' 7 पैकी एक ट्रिक

Solapur Goa flight: सोलापूर-गोवा विमानसेवा हाऊसफुल; वर्षभरात १४ हजार प्रवासी, तिकीटदर १२ हजारांवर

SCROLL FOR NEXT