ahmednagar
ahmednagaresakal

नगर : 'त्या' मुलीच्या शोधासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Published on

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : तालुक्यातील बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलीला २३ जूलै रोजी आयुब शेख नावाच्या तरुणाने खोटे अमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेला सोमवारी (ता.९) तब्बल १७ दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप कुठलाही तपास लागलेला नाहीत. त्यामुळे शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या, असून आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता येथील मेनरोडवरुन गांधी पुतळ्यामार्गे घोषणा देत, शहर पोलीस ठाण्यासमोर निषेध मोर्चा काढण्यात आला.

कुटुंबियांना ताब्यात घेवून सखोल चौकशीची मागणी

यावेळी सबंधीत आरोपीच्या कुटुंबियांना ताब्यात घेवून सखोल चौकशी करण्याची मागणी मुलीच्या आईने पोलिस प्रशासनाकडे केली. या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन दिले. पोलिस प्रशासनाने सदर मुलीचा तातडीने शोध घेवुन तिला पळून नेणारया आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

ahmednagar
श्रावणातल्या यात्रा कोविडमुळे या वर्षीही बंदच
ahmednagar
....अन् सुतारवाडीत अचानक उतरले अज्ञात ड्रोन! नागरिकांत भिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com