"That MLA's wife is also affected by Corona ... Lot of 20 in the city today 
अहिल्यानगर

"त्या' आमदाराची पत्नीही कोरोना बाधित... आज नगरमध्ये 20चा लॉट 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगरमध्ये कोरोनाने भलताच वेग घेतला आहे. राजा असू की रंक कोरोनाने कोणालाही डंख मारायचे सोडले नाही. जिल्ह्यातील आमदाराची पत्नीही कोरोना बाधित निघाली. यापूर्वीही "तो' आमदारही कोरोना बाधित झाला असून, तो मुंबई येथे उपचार घेत आहे. आज आणखी 20 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 638 पोचला आहे. 

नुकत्याच जिल्ह्यातील एका आमदाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यापाठोपाठ काल (रविवार) पत्नीचाही रिपोर्टही सकारात्मक आल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारी 20 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. यात नगर शहर 13, कर्जत तालुका दोन, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगार (नगर) अशा रुग्णांचा समावेश आहे. 

नगर शहरात भराड गल्ली येथे सहा, तोफखाना चार, शास्त्रीनगर, सातभाई मळा आणि गंज बाजार, गवळी वाडा (भिंगार) प्रत्येकी एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय पाथरे बुद्रूक (राहुरी), रानेगाव (शेवगाव), जामखेड, माही जळगाव व पाटेगाव (कर्जत), पिंपरी जलसेन (पारनेर) येथे एक रुग्ण आढळून आला. जिल्ह्यातील सध्या 203 जणांवर उपचार सुरू आहे. 

आणखी 18 जणांची कोरोनावर मात 
जिल्ह्यातील आणखी 18 जणांनी कोरोनावर मात मिळवली. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात महापालिक क्षेत्रातील दहा, संगमनेर चार, राहाता तीन आणि नगर तालुक्‍यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 418 झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: श्वानाच्या पिल्लाला बिबट्याचे अभय, बावड्या गावातील घटना सीसीटीव्हीत कैद

अमित ठाकरेंविरोधात BJP आक्रमक, माहीममध्ये भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Mamata Banerjee Relative Death : ममता बॅनर्जींच्या नातेवाईक महिलेचा संशयास्पद मृत्यू; पतीसोबत सुरू होता घटस्फोटाचा खटला

१०२ पेक्षा जास्त ताप तरीही निवेदिता सराफ यांनी केलं 'कृष्णाईच्या लेकी'चं शूटिंग; अभिनेत्याच्या हातालाही होती सलाइन

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

SCROLL FOR NEXT