MP Sujay Vikhe Patil  esakal
अहिल्यानगर

महाविकास आघाडी राज्यात; तालुक्यात नाही - खासदार डॉ सुजय विखे

सकाळ वृत्त सेवा

टाकळी ढोकेश्वर (जि. अहमदनगर) : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. भाजप विरोधी बाकावर आहे. मात्र, पारनेर तालुक्यात भाजप-शिवसेना एकत्र आहे. माझ्यासोबत व्यासपीठावर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना बरोबर घेण्याची प्रेरणा (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांनी दिली असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. गोरेगाव (ता. पारनेर) येथे खासदार डॉ. विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार डॉ. विखे म्हणाले,

''पारनेर तालुक्यास विकासकामांना सर्वाधिक निधी दिला आहे. याचा उद्देश एकच; सर्वांनी एकत्र येऊन तालुका वेगळ्या उंचीवर न्यायचा आहे.

परिसरातील दहा ते वीस गावे मिळून, मोठ्या गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण ठेवण्यात येत असल्याने, कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे असे वाटते. त्यामुळे प्रत्येक गावात जाऊन लसीकरण करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारचे तसे निर्देश आहेत. अमेरिकेत एक लस बारा हजार रुपयांना घ्यावी लागते. मात्र, भारतात लसीकरणावर ३५ हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्चणार.''

...तर चर्चेतून विषय मार्गी लावला असता

नागरिक व प्रशासनात समन्वयाचे काम लोकप्रतिनिधी करतात. तहसीलदारांच्या कथित ऑडिओ क्लिपचा विषय राज्यपातळीवर गेला आहे. माझ्यापर्यंत तक्रार आली नाही. आली असती, तर चर्चेतून हा विषय मार्गी लागला असता. चर्चेने प्रश्‍न सुटू शकतात, असे मत यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब तांबे, सुभाष दुधाडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier Martyred: मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचे स्वप्न अपुरेच! १५ दिवसांवर असताना उरीत जवान अर्जुन जाधव हुतात्मा, बाबा येणार होते घरी...

Latest Marathi News Live Update : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आज 'कॉक्रोच जनता पार्टी'चे आंदोलन

जगबुडी नदीत बुडून तीन भावांचा अंत, मुंबईतील कुटुंबावर काळाचा घाला; काठावर दोन भाऊ हताश

Amethi Samosa : ट्रेन थांबताच प्रवाशांची तुटून पडणारी गर्दी! फक्त समोशांवर GST भरणाऱ्या त्रिवेदी परिवाराने ४४ वर्षांपासून कशी जपली 'शटल एक्सप्रेस'ची चव?

Maharashtra Farmer Loan Waiver : कर्जमाफीसाठी तूर्तास १५ हजार कोटीच, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना धक्का, प्रोत्साहनपर अनुदानाचा निधी लांबणीवर?

SCROLL FOR NEXT