Lockdown at Nevasa Fata 
अहिल्यानगर

नेवासे फाटाही झाला इतके दिवस लॉकाडाउन

चंद्रकांत दरंदले

नेवासे फाटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासेनंतर नेवासे फाटा येथे देखील मुकिंदपूर ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुकुंदपुर ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश निपुंगे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे परिसरातून स्वागत करण्यात येत आहे. 

नेवासे व नेवासे फाटा परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव थांबावा या उद्देशाने मुकिंदपूर ग्रामपंचायतीने शनिवारी सायंकाळी सात वाजेपासून 15 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज शुक्रवार (दि.9) रोजी सकाळपासून येथील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून या निर्णयाचे कडेकोट पालन केल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासे फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यापारी व ग्रामस्थांची बैठक झाली होती. त्यावेळी सरपंच सतीश निपुंगे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त करून त्याचे गांभीर्य सर्वांना समजावून सांगितले होते. 

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण नेवासे शहरात आढळून आले असल्याने येथून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या मुकिंदपुर ग्रामपंचायत हद्दीतील व्यावसायिक व ग्रामस्थांनी याची गंभीर दखल घेत जनता कर्फ्यू पाळण्याचा स्वयंस्फूर्तीने व एकमताने निर्णय घेतला. 

या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये फक्त दवाखाने व औषध दुकाने सुरू राहणार आहेत. इतर सर्व दुकाने, व्यवसाय शंभर टक्के बंद राहणार असून या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सतीश निपुंगे यांनी दिली.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT