Gutkha
Gutkha  esakal
अहमदनगर

धडक कारवाईत पोलिसांना मिळाले १ कोटींचे घबाड; दहा आरोपी गजाआड

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : कोतवाली पोलिसांनी सुगंधी सुपारी आणि गुटखा विक्री करणारी टोळी जेरबंद केली आहे. एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अबब! इथे तर अख्खे गोडावून भरलेले

कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मार्केटयार्ड परिसरात काही व्यक्‍ती दुचाकीवर गुटखा व सुगंधी सुपारी विक्री करण्यासाठी आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचासमक्ष छापा टाकला. आरोपी राकेशकुमारा जगदंबप्रसाद मिश्रा (वय 42, रा.एमआयडीसी), अभिजित गोविंद लाटे (वय 34, रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) त्यांना त्यांच्याकडील गुटख्या बाबत चौकशी केली असता, त्यांनी एमआयडीसीतील गुटख्याचे गोडावून असल्याचे सांगितले. कोतवालीच्या पथकाने या ठिकाणी काही जण गुटख्याचे पाकिटे मोजताना आरोपी राहुल कैलासनाथ सिंग (वय 24, रा. उत्तर प्रदेश ह.रा. बोल्हेगाव), आझर शकील शेख (वय 31, रा. बोल्हेगाव), चंद्रकेश शोभनाथ तिवारी (वय 50, रा. उत्तर प्रदेश, ह.रा. बोल्हेगाव), शिवप्रकाश रामकुमार तिवारी (वय 48, रा. उत्तर प्रदेश, ह.रा. बोल्हेगाव), मोहसिन शब्बीर पटेल (वय 36, रा. बोल्हेगाव), अर्जुन शंकर यादव (वय 46, रा. मुंबई, ह.रा. बोल्हेगाव), नितीन सुनील साठे (वय 32, रा. बोल्हेगाव), शादाब शब्बीर पटेल (वय 29, रा. बोल्हेगाव) यांना अटक करण्यात आले आहे. पत्र्याचे गोडावूनचे मालक रावसाहेब शिवाजी भिगारदिवे हे फरार झाले आहेत.

असा आहे एक कोटीचा मुद्देमाल

या गोडावूनमध्ये 97 लाख 93 हजार 920 रुपये किंमतीचा गोवा गुटखा, तीन लाख 62 हजार 800 रुपयांची सुगंधी तंबाखू, दोन लाख 35 हजार रुपये किंमतीचे विविध कंपनीचे मोबाईल, दोन लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी, 32 हजार रुपये रोख रक्कम असा एकून एक कोटी सहा लाख 23 हजार 720 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT