रिलायन्स जिओला मोठा झटका! गमावले 1.29 कोटी ग्राहक; तर एअरटेलने..

reliance jio loses 1.29 crore mobile subscribers airtel adds 4.75 lakh in December 2021 trai
reliance jio loses 1.29 crore mobile subscribers airtel adds 4.75 lakh in December 2021 trai reliance jio

डिसेंबर 2021 मध्ये भारतात मोबाईल वापरकर्त्यांची (Mobile Users) संख्या 1.28 कोटींनी कमी झाली आहे. दरम्यान नुकचेच प्रसिध्द झालेल्या ट्राय डेटा (TRAI Data) नुसार, रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) ला यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे, परंतु भारती एअरटेल (Airtel) च्या ग्राहकांची संख्या मात्र वाढली आहे.

रिलायन्स जिओने सुमारे 1.29 कोटी वायरलेस ग्राहक गमावले असून मागच्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये त्यांचा मोबाइल ग्राहकांची संख्या 41.57 कोटी इतकी कमी झाली आहे. सोबतच Vodafone Idea ने देखील डिसेंबर 2021 मध्ये 16.14 लाख मोबाईल ग्राहक गमावले आहेत आणि आता त्यांचे जवळपास 26.55 कोटी इतके ग्राहक आहेत. याउलट, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) जारी केलेल्या ग्राहकांच्या आकडेवारीनुसार एअरटेलला डिसेंबरमध्ये 4.75 लाख नवे ग्राहक मिळाले आणि त्याचा वायरलेस वापरकर्ता बेस 35.57 कोटी झाला आहे.

reliance jio loses 1.29 crore mobile subscribers airtel adds 4.75 lakh in December 2021 trai
सॅमसंगने भारतात लॉन्च केले 3 नवे स्मार्टफोन, पाहा काय आहे किंमत

डिसेंबरमध्ये 'इतक्या' वापरकर्त्यांनी नंबर पोर्ट केला

डिसेंबरमध्ये एकूण 8.54 मिलीयन मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) रिक्वेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी 4.91 मिलियन रिक्वेस्ट झोन-1 मधून आल्या आणि उर्वरित 3.63 मिलियन रिक्वेस्ट झोन-2 मधून आल्या. MNP झोन-1 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्वेस्ट आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये MNP झोन-2 मध्ये सर्वाधिक MNP रिक्वेस्ट आहेत.

reliance jio loses 1.29 crore mobile subscribers airtel adds 4.75 lakh in December 2021 trai
आधार, पॅनकार्ड सारखे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवा सुरक्षित, ही आहे पध्दत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com