In the open market, the price of a trumpet is six and a half thousand rupees 
अहिल्यानगर

तुम्ही तूर विकलीय का? बाजार गेलाय ६ हजार २५०, आणखी वाढेल दर

सूर्यकांत नेटके

नगर : शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने तूर खरेदी केंद्रे सुरू केली. मात्र, खुल्या बाजारातच तुरीने हमीभावाचा (सहा हजार रुपये क्विंटल) टप्पा ओलांडला आहे. येथील बाजार समितीत तुरीला तब्बल 6250 रुपये दर मिळत आहे.

काही ठिकाणी तर साडे सहा हजारांपर्यंत दर गेल्याची माहिती मिळाली. सध्या शहरासह जिल्हाभरात सुमारे पाचशे क्विंटल तुरीची आवक होत आहे. खुल्या बाजारात दर वाढल्याने सरकारची खरेदी केंद्रे ओस पडली आहेत. अनेक वर्षांनंतर हमीभावापेक्षा तुरीला अधिक दर मिळाला आहे. 

जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात तूर पेरणी झाली होती. काही भागातील नुकसान वगळता, चांगल्या पावसामुळे यंदा तुरीचे बंपर उत्पादन निघाले. कृषी विभागाच्या अंदाजानुसार साडे नऊ क्विंटल हेक्‍टरी उत्पादन सांगत असले, तरी प्रत्यक्षात हेक्‍टरी 15 क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळाले आहे.

तूर बाजारात आल्यानंतर दर्जा चांगला नसल्याचे सांगत, कमी दराने खरेदी केली जात असल्याने सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारे तूर खरेदी केंद्रे सुरू झाली. मात्र, यंदा पहिल्यांदाच खुल्या बाजारातच तुरीने हमीदराचा टप्पा ओलांडला आहे. 

महिनाभरापूर्वी तुरीला साधारण पाच हजार रुपये, तर 15 दिवसांपूर्वी साडेपाच हजार रुपये दर मिळाला. मात्र, गेल्या आठ दिवसांत त्यात वाढ होत, तब्बल सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. खरेदी केंद्रावर तुरीची सहा हजार रुपये क्विंटलने खेरदी केली जात आहे, तर खुल्या बाजारात 6250 रुपये क्विंटल दर झाला आहे.

सात ते आठ हजार होईल भाव

खुल्या बाजारात तुरीचे दर वाढल्याने खरेदी केंद्रे ओस पडल्याचे दिसत आहे. तुरीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. सात ते आठ हजारापर्यंत दर वाढू शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तुरीच्या दरवाढीमुळे तूर डाळीचे बाजार कडाडण्याची शक्‍यता आहे. 

टप्प्याटप्प्याने तूर विकावी 
जिल्ह्यात 12 ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू झाली होती. मात्र, खुल्या बाजारातच अधिक दर मिळत असल्याने ही केंद्रे ओस पडली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 700 शेतकऱ्यांनी 7042 क्विंटल तूरविक्री केली आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आठ हजारांवर आहे. केंद्रांवर आता तुरीची आवक कमी झाली आहे. दरवाढ होत असली, तरी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने तुरीची विक्री करावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

SCROLL FOR NEXT