Opposition to the work suggested by the people's representatives 
अहिल्यानगर

लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांना विरोध

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या लेखी प्रतिपादन सभेत सर्व विषय मंजूर झाले आहेत. मात्र, त्यातील काही विषयांवर सदस्यांनी अभिप्राय नोंदवून चर्चा व्हावी असे म्हणून मतदान केले. 

जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

या सभेत सहा विषय होते. त्यातील 2019-20 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत मंजूर कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यावर काही सदस्यांनी आक्षेप घेत त्यावर चर्चा होऊन मंजुरी द्यावी, असे मत व्यक्त करत दोघांनी त्यावर आक्षेप घेतला.

हेही वाचा ः "कोरोना'चा मराठी शाळांना हा होणार फायदा, मास्तरांची थांबणार वणवण 
 
राष्ट्रीय महामार्ग 50 ते निरगुडवाडी (ता. अकोले) या रस्त्याच्या एक किलोमीटर डांबरीकरणास मान्यता देणे, नरेंद्रनगर दहिगाव-ने, शहरटाकळी, सुलतानपूर, देवटाकळी (ता. शेवगाव) येथील गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ते करणे, यासह सर्व सहा विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. 


जुन्या इमारतीचा श्‍वास मोकळा होणार 
जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील व पंचायत समितीच्या गोडावूनमधील विनावापर निरुपयोगी व साहित्याच्या निर्लेखनास मान्यता व शिफारस करण्याच्या विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेची जुनी इमारत मोकळा श्‍वास घेणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये बैठका होत असताना जिल्हा परिषदेत बैठका घेण्यास जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून 144 कलम दाखविले जात आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी 144 चा बागुलबुवा थांबविणे गरजेचे आहे. 
- अनिल कराळे, जिल्हा परिषद सदस्य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT