PM Modi Ahmednagar Visit Esakal
अहिल्यानगर

PM Modi Ahmednagar Visit: मोदींच्या कार्यक्रमासाठी नागरिकांना आणायला पाठवलेल्या गाड्या माघारी... जाणून घ्या कारण

पंतप्रधान मोदींच्या शिर्डी दौऱ्यावरून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची सुरू असलेली जोरदार तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

शिर्डी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे. तर पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाले आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांना आणायला पाठवलेल्या गाड्या आंदोलकांनी माघारी पाठवल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाले आहेत. कार्यक्रमासाठी नागरिकांना आणण्यासाठी पाठवलेल्या गाड्या आंदोलकांनी माघारी पाठवल्या आहेत. मोदींच्या कार्यक्रमासाठी नागरीकांना या बसमधून नेण्यात येणार होतं, मात्र आंदोलकांनी या बस माघारी पाठवल्या आहेत.

कसा असेल पंतप्रधान मोदींचा अहमदनगर दौरा?

पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीत दाखल होणार

त्यानंतर पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिराचं दर्शन घेत, पूजा करतील

पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन करणार

यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल

पंतप्रधान दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील

सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश

या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्याला रवाना होतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

Bullock Cart Racing : 'किंग' ठरला सांगलीचा खिलार! बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठताच खोंडांची तुफान क्रेझ; लाख-दीड लाखाचा खोंड विकला जातोय 8 लाखांत

विशेष : इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म कसा भरावा?

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT