
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगरकडे रुग्णाला घेऊन जात असताना दौलावडगावच्या दत्तमंदीराजवळ रुग्णवाहिका आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सांगवीपाटण येथील डॉ.राजेश झिंजुर्के आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडेसह अन्य दोन जण असे चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी आहे. जखमीवर उपचार सुरु आहेत. या रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते.
व्यंको कंपनीकडे वळण घेत असताना भरधाव रुग्णवाहिकेने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात होऊन डॉक्टरांसह चौघांचा मृत्यू झाला आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक (एमएच 21 एक्स 8600 ) हा धामणगावकडून अहमदनगरच्या दिशेने जात होता. रात्री साडेअकराच्या दरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या भरधाव रुगणवाहिकेची (एमएच 16 क्यू 9507 ) जोरदार धडक बसली.
या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सीताराम लोखंडे (वय 35, रा. धामणगाव ता. आष्टी), मनोज पांगु तिरपुडे, पप्पू पांगु तिरपुडे (दोघे रा. जाटदेवळा, ता. पाथर्डी जि. नगर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर रुग्णवाहिकेतील डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के (वय 35, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी) यांचा नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रुग्णवाहिकेतील ज्ञानदेव सूर्यभान घुमरे (वय 45, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी) या गंभीर जखमीवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णवाहिकेच्या अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि ढाकणे, पोलिस उपनिरीक्षक सातव, सफौ रोकडे, पोशि केदार, शिरसाट, चालक पोशि कांबळे यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना अहमदनगर येथे दवाखान्यात दाखल केले.
मुंबईहून बीडकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस उलटून सहा ठार
मुंबईहून बीडकडे जात असलेल्या सागर ट्रॅव्हल्सची बस तालुक्यातील हरिनारायण आष्टा फाटा परिसरात उलटून सहा प्रवासी ठार झाले आहेत. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना आष्टी व जामखेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. याबाबतची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. हरिनारायण आष्टा फाट्यावरही तातडीने पोलीस व परिसरातील लोकांनी मदतकार्य सुरू केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.