Radhakrishna Vikhe Patil Sakal
अहिल्यानगर

महाविकास आघाडी सरकारकडून राजकीय दहशतवाद : विखे पाटील

सकाळ डिजिटल टीम

शिर्डी (जि. नाशिक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांबाबत आक्षेपार्ह विधाने केली तेव्हा भाजपने गुन्हे दाखल केले नाहीत. मात्र, महाविकास आघाडीचे हे सरकार पोलिस व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून राजकीय दहशतवाद निर्माण करीत असल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, भाजप कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, यासह अन्य मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून देण्यात आले.

त्यावेळी विखे पाटील बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, रवींद्र गोंदकर, रवींद्र कोते, ताराचंद कोते, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, गणेशचे संचालक मधुकर कोते, कैलास सदाफळ, पोपट शिंदे, गणेश कोते, विकास गोंदकर, सोमराज कावळे, सुधीर शिंदे आदी उपस्थित होते.

आमदार विखे म्हणाले, की सरकारविरोधी जनमताची भूमिका मांडणे, तसेच आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. याची मोठी किंमत भविष्यात विकास आघाडी सरकारला मोजावी लागेल. महाविकास आघाडीचा ड्रामा जनतेने बघितला आहे. पोलिसांना पुढे करून हे सरकार राजकीय दहशतवाद करीत आहे. मात्र, कायदे व नियम धाब्यावर बसवून, सत्तेचा गैरवापर करीत कोणालाही अटक करता येऊ शकते, हा सरकारचा भ्रम मोडीत निघाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या जनआशीर्वाद यात्रेला राज्यात मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता, आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यात्रेला रोखण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, ॲड रघुनाथ बोठे यांनीही मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

SCROLL FOR NEXT