राणेंप्रमाणे आता संजय राऊतांवर कारवाई करा; भाजपची मागणी

bjp
bjpSakal

नाशिक : आक्षेपार्ह बोलले म्हणून पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच न्यायाने आक्षेपार्ह लिखान छापून शहरभर होर्डिंग लावल्याबद्दल सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करीत आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड राहूल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले.

नाशिक शहरात आज ठिकठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविषयी लिखानाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यातील मजकूराबाबत शहर पोलिसांनी कारवाई करावी ? अशी मागणी करीत, आज बुधवारी (ता.२५) आमदार फरांदे, ढिकले, भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे, माजी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समितीचे सभापती गणेश गिते, हिमगौरी आडके, आदीच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेतली.

bjp
नाशिक पोलिसांची राणेना नोटीस; २ सप्टेंबरला राहावे लागणार हजर

शहरात आज बुधवारी सकाळी ठिकठिकाणी होर्डिंग लागले. पोलिस आयुक्तांना याबाबत कल्पना देऊनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. कायदा सर्वांना समान आहे त्यामुळे राऊत यांच्यावरही गुन्हा दाखल करून कारवाई करावी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते समोरासमोर भिडले. त्यात दगडफेकीत भाजप कार्यालयाचे नुकसान झाले. दगडफेक करणाऱ्यांना अभय दिले जात असून त्यांना अटक केलेली नाही. कार्यालय फोडणाऱ्यांना मुंबईत लपविले असून, त्यांचे मुख्यमंत्री अभिनंदन करत आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी अटक करायला थेट रत्नागरीला पोहोचणाऱ्या नाशिक पोलिसांना भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांना अटक करता आलेली नाही. कार्यालय फोडणारे संशयित मुंबईत लपले आहे. पोलिसांना हाताशी धरून राजकारण होत असल्याचाही आरोप पदाधिकाऱ्यांनी केला या वेळी केला.

bjp
नाशिक शहरभर सामना अग्रलेखाचे बॅनर; शिवसेना-राणे वाद पेटणार

योगी मुख्यमंत्री नव्हेत का?

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी २०१८ मध्ये चप्पलाने मारले पाहिजे. या आणि अशा प्रकारचे लिखान केले असल्याने त्यांच्यावर आक्षेपार्ह छपाईबद्दल गुन्हा दाखल का करु नये. मुख्यमंत्र्यांकडून व शिवसेनेकडून कायमच आक्षेपार्ह बोलले जाते मग कायदा फक्त भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायलाच आहे का? असा आरोपही केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेही खुलेआम त्यांचे समर्थन करतात. मग मुख्यमंत्र्यांना वेगळा न्याय का? असा आरोप यावेळी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com