Rajendra Phalke's criticism of Ram Shinde 
अहिल्यानगर

जेवण करून उपोषण करणाऱ्या शिंदेंनाच आमदारकीच्या शिफारशीची गरज, फाळकेंचा पलटवार

सकाळ वृत्तसेवा

नगर ः भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी काल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना विधान परिषदेवर घ्या, अशी मागणी केल्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप करताना त्यांनी फाळके यांचे नाव पुढे करून नक्कीच सुंदोपसुंदी लावण्याचा प्रयत्न केला, असं राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र, त्याला फाळके यांनी लगेच प्रतिक्रिया देऊन छेद दिला आहे.

कुकडीच्या पाण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी उपोषण केलं. त्यावेळी त्यांनी वरील मागणीवजा शिफारस केली. त्या शिफारशीचा फाळके यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणतात, राम शिंदे यांनाच आमदारकीसाठी शिफारशीची गरज आहे, मला नाही. कारण माझे नेते ठरवतील, माझे काय करायचे ते. त्यांना वाटत होतं विधानसभा पराभवानंतर विधान परिषदेवर वर्णी लागेल. मात्र, वर्णी लांब राहिली, साधे नावही चर्चेत आलं नाही. त्यांना ते दुःख आहे. दुसऱ्याच्या घरात डोकवून काही फायदा होणार नाही.

आवर्तनाची तारीख जाहीर झाल्यावर उपोषण

राम शिंदे यांनी आवर्तनाची तारीख जाहीर झाल्यानंतर उपोषण करून स्टंट केला आहे. सकाळी जेवण करून यायचं आणि तासाभरानंतर उपोषण सोडायचं, हा स्टंट नाही तर काय आहे? अधिकारी उपोषण सुरू करण्यापूर्वी तेच सांगत होते आणि त्याच आश्वासनानंतर उपोषण सोडायचं...लोकांना हे सगळं कळतं. त्यांनी एक सांगावे, ते आमदार होते, मंत्रीही झाले, त्यांच्या काळात जामखेड आणि चौंडीला कितीवेळा पाणी मिळाले?नदीकाठच्या आणि टेलच्या लोकांना हे सगळं माहिती आहे. आमदार रोहित पवार नाही तर तु्म्ही बनवाबनवी करीत आहात, असाही पलटवारी फाळके यांनी केला.

आमदारांचे काम राज्यात एक नंबर

आमदार रोहित पवार यांचे काम जिल्ह्यातच नाही तर राज्यात एक नंबर आहे. ही सर्व जनता जाणते. कोरोनाच्या काळात त्यांनी कर्जत-जामखेडच नाही तर राज्यासाठी काय काम केले आणि तुम्ही नेमके कुठे होतात, याचीही माहिती लोकांकडे आहे. जामखेड हॉटस्पॉट झाले, राशीनला रूग्ण सापडले, त्यावेळी तुम्हाला जनतेची आठवण का आली नाही. आता कुठेच काही डाळ शिजत नाही म्हणून उपोषणाचा स्टंट करायचा आणि विरोधकांच्यात भांडणे लावायची, अशाने काही होणार नाही. माझी निष्ठा पवार घराण्याशी आणि पक्षासोबत आहे. तुमची शिफारस जर शुद्ध हेतूने असती तर तिचे स्वागतच होते. परंतु आपल्या राजकारणासाठी दुसऱ्याच्या पक्षात काड्या घालायचे सोडून द्या, अशी सूचनाही फाळके यांनी राम शिंदेंना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Deploys 12 Nuclear Warheads: दुनियावालों हमें बचाओ! भारताने इतिहासात पहिल्यांदाच गोदामातून काढले १२ अणुबॉम्ब; पाकची भीतीने गाळण

नुकताच साजरा केला वाढदिवस; किती वर्षांची झाली तेजश्री प्रधान? फोटो शेअर करत सांगितलं स्वतःचं खरं वय

IND vs AFG: उद्यापासून वन-डेचा थरार! टीव्ही अन् मोबाईलवर LIVE मॅच कधी, कुठे पाहायची? जाणून घ्या वेळ

Kalyan: निर्दयीपणाचा कळस! जन्मानंतर अवघ्या सहा दिवसांतच चिमुकलीला कचऱ्यात टाकलं; कल्याणमध्ये हृदयद्रावक घटना

१.७ लाखांचा पगार... तरी महिनाअखेर खात्यात उरतात फक्त २,५२० रुपये; प्रत्येक मध्यमवर्गीयाने वाचावी अशी गोष्ट

SCROLL FOR NEXT