ahir fish
ahir fish esakal
अहमदनगर

जायकवाडीत मिळाला 'सोन्याचा' मासा; ज्याला सापडला तो भाग्यवान!

सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि.अहमदनगर) : सोन्याचे मोल आणि औषधी गुणधर्म असलेला 'तो' दुर्मिळ मासा (rare fish) जाळ्यात घावला की कोळ्याचे भाग्य उजाडते. ‘घावला, घावला, अहीर घावला...’ त्याच्या होडीवर एकच कल्ला सुरू होतो. बाजारात येण्यापूर्वीच खवय्यांनी त्यावर बोली लावलेली असते. असा हा बहुगुणी मासा (ता.4) जायकवाडीच्या (jayakwadi dam) जलाशयात सापडला.

दुर्मिळ माशात औषधी गुणधर्म, सोन्याचे मोल

आशियायी देशांतील खवय्यांच्या ताटात त्याला फार पूर्वीपासून मानाचे स्थान. पाण्याबाहेर काढला, की सापासारख्या लांबसडक आकाराचा 'अहीर' मासा.. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर बुळबुळीत चिकट द्रव स्रवू लागतो. त्यामुळे तो पकडणाऱ्याच्या हातातून सहज सटकतो. पुन्हा हा पाण्याकडे सरपटू लागतो. हा द्रवदेखील औषधी समजला जातो. काही मच्छीमार या द्रवात कणीक भिजवून गोळ्या तयार करतात. त्याला पुन्हा पाण्यात सोडून देतात. औषध म्हणून या गोळ्यांचे सेवन केले जाते. जिभेचे लाड पुरवीत तो पोटात गेला, की खवय्यांना दिव्य औषधी सेवन केल्याचे समाधान मिळते. असा हा बहुगुणी मासा काल जायकवाडीच्या जलाशयात घावला. येथील एका जाणकार खवय्याने आधीच बोली लावलेली असल्याने, तेथून तो थेट शिर्डीत आला. वजन दोन किलो आणि किंमत दहा हजार रुपये.

ज्याला सापडतो, तो भाग्यवान!

खरेदीदार किती शौकीन, यावर त्याचा भाव ठरतो. पाच ते वीस हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत त्यावर आगाऊ बोली लावलेली असते. पूर्ण वाढलेला अहीर पाच फूट लांब आणि पंधरा ते वीस किलो वजनाचा असतो. यावरून त्याचे मोल लक्षात येते. दहा ते पंधरा वर्षे आयुष्यमान असलेला हा दुर्मिळ मासा जोडीने राहतो. त्यामुळे एकाच वेळी दोन मासे जाळ्यात अडकले, तर कोळ्याचे भाग्य उजळते. शरीरात प्राणवायूची पिशवी असल्याने, पाण्याबाहेर काढल्यानंतरही तो हवेत बराच काळ जिवंत राहू शकतो. चवीला स्वादिष्ट आणि पापलेटसारखा एकच काटा असल्याने, खायला सोपा. जायकवाडी जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षातून एखाद्या वेळी हा मासा सापडतो. ज्याला सापडतो, तो भाग्यवान!

अहीर हा मासा पूर्वीपासूनच दुर्मिळ आहे. प्रत्येक जातीच्या माशात औषधी गुणधर्म असतातच. मात्र, अहीरला ग्राहकांची एवढी पसंती असेल, तर त्याचे संरक्षण व संवर्धन करून पैदाशीला चालना द्यायला हवी. मत्स्यपालन विभागाने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. - डॉ. एम. वाय. देशमुख, जनरल सर्जन, शिर्डी

औषधी गुणधर्म असलेला अहीर मासा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा मासा आशियायी देशाचे एका अर्थाने भूषण आहे. प्राचीन काळापासून त्याबाबत वेगवेगळ्या दंतकथा ऐकायला मिळतात. ही जात संरक्षित करणे गरजेचे आहे. हे काम अवघड आहे असे नाही. - शरद निमसे, अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT