urban bank 
अहिल्यानगर

अर्बनवर रिझर्व्ह बँकेची कारवाई...केला ४० लाखांचा दंड

सकाळ वृत्तसेवा

नगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवला आहे. याच कारणाने बुधवारी 27 मे रोजी 40 लाख रुपयांचा दंड केला. "आरबीआय'च्या नियमांचे पालन करण्यात नगर अर्बन बॅंक अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. अर्बन बॅंकेला यापूर्वीही रिझर्व्ह बॅंकेने पाच लाखांचा दंड केला होता. 

नगर अर्बन बॅंकेची वैधानिक तपासणी आरबीआयद्वारे करण्यात आली होती. त्यामध्ये बॅंकेची 31 मार्च 2018 रोजीची आर्थिक स्थिती, आयआरएसी मानदंडांवरील आरबीआय निर्देशांचे पालन न करणे, प्रगती व एक्‍स्पोजर मानदंडांचे व्यवस्थापन व वैधानिक किंवा इतर निर्बंधांचे व्यवस्थापन आणि प्रवेशावरील पोटकायद्यांचे पालन न करणे या बाबी त्यात आढळून आल्या. त्यानुसार बॅंकेला नोटीस बजावण्यात आली. त्यावर वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बॅंकेचे लेखी उत्तर आणि तोंडी म्हणणे विचारात घेतल्यानंतर आरबीआय या निष्कर्षापर्यंत पोचली की आयआरएसी मानदंड, व्यवस्थापनविषयक प्रगती आणि एक्‍स्पोजर नॉर्म्स आणि वैधानिक किंवा इतर निर्बंधांवरील आरबीआयच्या निर्देशांचे पालन केले गेलेले नाही. त्यामुळे संबंधित आर्थिक दंड लावण्यात आल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे मुख्य सरव्यवस्थापक योगेश दयाल यांनी 27 मे रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, बॅंकेच्या अनियमित कारभारामुळे अर्बन बॅंकेवर सध्या प्रशासक कार्यरत आहे. त्यात आता पुन्हा चाळीस लाख रुपयांचा दंड भरण्याची वेळ आली आहे. यापूर्वीही बँकेच्या कर्जवाटपावरून आरोप झाले होते. बँकेच्या शाखांचा विस्तारही गाजला. अलिकडच्या काळात बँकेबाबत उठत असलेल्या वावड्यामुळे ठेवीदार धास्तावले आहेत. मात्र, प्रशासकांकडून त्यांना दिलासा दिला जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : राजगड तालुक्यात नसरापूर घटनेची पुनरावृत्ती टळली; अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, आरोपीने लाईट बंद केली अन्...

Chhatrapati Sambhajinagar Traffic Issue: पाइपलाइनच्या कामामुळे क्रांती चौक जाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचे मोठे हाल

अनिल कपूर-नाना पाटेकर पुन्हा एकत्र; ‘वेलकम’नंतर उदय-मजनूची कॉमेडी पुन्हा रंगणार, यावेळी झॉम्बींच्या दुनियेत धिंगाणा घालणार!

Marathi News Live Updates : आंदोलनाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न, विद्यार्थ्यांनी एकजूट कायम ठेवावी; देवेंद्रनाथ महतो यांचं आवाहन

Koyna Dam Latest Update : कोयना पाणलोट क्षेत्रात धुवांधार! पाणीसाठा 96.65 टीएमसीवर; धरणातून तब्बल 8,054 क्युसेकने विसर्ग सुरू, महाबळेश्वरात किती पाऊस?

SCROLL FOR NEXT