कोरोना लागला गुणाकाराला...नगरमध्ये एका दिवसातील कोरोना बाधितांचा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

कुटुंबच्या कुटुंब बाधित व्हायला लागली आहेत. तिसऱ्या टप्प्यात कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. बेफिकीर वृत्तीमुळेच बाधितांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

नगर ः कोरोनाने नगर जिल्ह्यात गुणाकार सुरू केला आहे. दररोज किमान दहा रूग्ण सापडत आहेत. कुटुंबच्या कुटुंब बाधित व्हायला लागली आहेत. तिसऱ्या टप्प्यात कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. बेफिकीर वृत्तीमुळेच बाधितांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात तब्बल चौदा रूग्ण आढळून आले. काल तेरापर्यंत आकडा होता.

एकीकडे रूग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. तेवढीच एक दिलासादायक गोष्ट आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आणखी ०६ रुग्ण बरे होऊन परतले. नगर शहरातील ०३ पाथर्डी,  संगमनेर येथील प्रत्येकी ०१ आणि संगमनेर येथीलच नाशिक येथे उपचार घेत असलेला रुग्णही बरा झाला. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ६८ झाली आहे. 

हेही वाचा - काय सांगता, हा तालुका दरवर्षीच लॉकडाउन पाळणार आहे

नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत आढळले. यात एक महिला आणि ०४ पुरुष. सथ्था कॉलनीतील हे कुटुंब आहे. संगमनेर येथील दोन व्यक्तींचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह निघाल्या.

राशीन (कर्जत) येथील ७० वर्षीय पुरुष आणि १४ वर्षीय मुलगी बाधीत आहे. कालच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.
संगमनेर येथील एकाच कुटुंबातील १३ आणि १७ वर्षीय मुले बाधित सापडली. कालच्या बाधित रुग्णाचे नातेवाईक आहेत.
शिर्डी येथील ५५ वर्ष वयाची महिला बाधित निघाली. निमगाव येथील बाधित महिलेच्या संपर्कात आली होती.
घाटकोपर येथून धामणगाव पाट (अकोले) येथे आलेला ४९ वर्षीय व्यक्ती बाधित आहे. भांडुप येथून कारेगाव (नेवासा) येथे आलेला ३५ वर्षीय युवक बाधित आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३१ झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात २३, अहमदनगर जिल्हा ६७, इतर राज्यातील ०२, व देशभरातील ०८ तर इतर जिल्ह्यातील ३१ आहेत. एकूण स्त्राव तपासणी  २३१७ इतकी झाली आहे. निगेटीव  २१४४, रिजेक्टेड ०२५, निष्कर्ष न निघालेले १५, अहवाल बाकी ०२ आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar has the highest number of corona cases in a single day