Repay the loan of ten thousand our bank will give ten lakh 
अहिल्यानगर

दहा हजारांचे कर्ज फेडा, आमची बँक दहा लाख देईल

दत्ता उकिरडे

राशीन : ""कोणतेही काम छोटे नसते. मात्र, प्रत्येक काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. बॅंकेने दिलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करा, हप्ते वेळेवर भरा. दहा हजारांचे कर्ज फेडा; आम्ही लाखांनी कर्ज देऊ. तुम्ही लाख फेडा, आम्ही दहा लाखांचे कर्ज देऊ,'' असे प्रतिपादन युनियन बॅंकेचे विभागीय अधिकारी सुनीलकुमार जदली यांनी केले. 

युनियन बॅंकेतर्फे आत्मनिर्भर योजनेंतर्गत कर्ज दिलेल्या नागरिकांना क्‍यूआर कोडचे वाटप करण्यात आले. त्या वेळी जदली बोलत होते. बॅंकेचे शाखाधिकारी सचिन क्षीरसागर, कर्मचारी व कर्जदार उपस्थित होते.

हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांना पीएम स्वनिधीच्या माध्यमातून आत्मनिर्भर अभियानांतर्गत प्रत्येकी 10 हजारांचे कर्जवाटप करण्यात आले. या कर्जदारांना जदली यांच्या हस्ते क्‍यूआर कोडचे वाटप करण्यात आले. त्या माध्यमातून कर्जखात्यात रक्कम जमा करण्यास व्यावसायिकांना मदत होणार असल्याचे शाखाधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले.

सामाजिक सुरक्षा योजनेतंर्गत केवळ 12 रुपयांत दोन लाखांचा अपघातविमा युनियन बॅंकेतर्फे केला जात असल्याचेही जदली यांनी सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update :Mumbai live : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत महत्त्वाची घोषणा

Maharashtra Budget 2026 : पुण्याचं रुप पालटणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केल्या 'या' मोठ्या घोषणा

Maharashtra Budget: महाराष्ट्राचे नवे गुंतवणूक व सेवा धोरण जाहीर! 4 लाख उच्च-कुशल रोजगारांचे लक्ष्य; उद्योगांना काय फायदे?

Long Life Numerology : 'या' 4 मूलांकाचे लोक 100 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगतात; सत्तरीनंतरही 'नो आजार', राहतात एकदम निरोगी

Second Solar Eclipse 2026: एक झालं आता दुसरं सूर्यग्रहण कधी? तारीख, वेळ जाणून घ्या! भारतावर याचा काय परिणाम

SCROLL FOR NEXT