Sambhaji Nagar esakal
अहिल्यानगर

Sambhaji Nagar: ऑनलाइन गेमिंग बेतलं जीवावर; खेळात पैसे हरल्याच्या तणावातून तरुणाची आत्महत्या

रुपेश नामदास

छत्रपती संभाजीनगर: तरुणाला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागले अन् त्यामध्ये ५० हजार रुपये हरला. या तणावातून तरुणाने चक्क हर्सूल तलाव गाठत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (ता.५) दुपारी उघडकीस आली. गौरव चंद्रकांत पवार (२३ रा. पवननगर, टीव्ही सेंटर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, अशी माहिती पोलिस, नातेवाइकांनी दिली.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गौरव याचे मेकॅनिकल डिप्लोमापर्यंत शिक्षण झालेले आहे. त्याला मागील काही दिवसांपासून ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन लागलेले होते. यात तो ५० हजार रुपये हरला होता.

दरम्यान ही बाब नातेवाइकांना माहिती झाल्यानंतर त्याची अवस्था पाहून त्याला ४० हजार रुपये दिले होते, तरीही तो तणावात होता. दरम्यान त्याने शुक्रवारी कुटुंबीयांसोबत जेवण केले आणि दुपारच्या सुमारास त्याने हर्सूल तलाव गाठला.

काहीवेळ तो काठावर बसलेला होता. अचानक त्याने तलावात उडी घेतली. ही बाब तेथील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आली असता, त्यांनी तत्काळ हर्सूल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी धाव घेत गौरवला बाहेर काढून घाटीत दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार एस. आर. वाघ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT