Praniti Shinde : बेळगावात आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळली; कारण आलं समोर

Praniti Shinde News
Praniti Shinde Newsesakal

बेळगावः कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. आमदार प्रणिती शिंदे बेळगावमध्ये एका सभेसाठी गेल्या होत्या. परंतु त्यांची सभा उधळून लावण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ही सभा उधळून लावल्याची माहिती आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांसह मराठी भाषिक सभास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत सभा उधळून लावली.

Praniti Shinde News
Sharad Pawar Resigns : पवारांनी का मागे घेतला राजीनामा?, 'प्रेस नोट'मध्ये केलं स्पष्ट

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची एक सभा बेळगाव जवळच्या देसूर गावात आयोजित करण्यात आलेली होती. या सभेत भगवे ध्वज घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य घुसले. त्यांनी एकच गदारोळ करीत सभेला पायबंद घातला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तरीही महाराष्ट्रातील इतर पक्षाचे लोक सभेसाठी जात असल्याचे मराठी भाषिक आणि समितीचे सदस्य आक्रमक झाले. प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावल्याने खळबळ उडाली आहे.

Praniti Shinde News
Jayant Patil : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्यास इच्छूक असलेल्यांची संख्या मर्यादित; पाटलांचा गौप्यस्फोट

सध्या कर्नाटक निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. विशेषतः काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल विषारी साप, असा शब्दप्रयोग केल्याने वातावरण पेटलं आहे. मोदींनी आजपर्यंत काँग्रेसने आपल्या ९२ शिव्या दिल्याचं सांगितलं. एकूणच कर्नाटक निवडणुकीत सध्या रंग भरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com