senior citizen esakal
अहिल्यानगर

मुलं झाली निष्ठुर, माजी सैनिक दांम्पत्याना काढले घराबाहेर

चंद्रभान झरेकर

अहमदनगर : अठरावर्षे भारतीय लष्करात सेवा करून निवृत्त झालेल्या वृद्ध आईवडिलांना मारहाण करून घराबाहेर काढले. त्यांच्यावर आता वणवण भटकण्याची वेळ आली आहे. मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात घरखर्चही भागत नसल्याने एकेकाळी देशाची सेवा केलेल्या या निवृत्त सैनिक व त्यांच्या पत्नीवर आता उपासमारीची वेळ आली आहे. मुलाने विश्वासात घेउन पित्याच्या नावावरील फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतला. पित्याच्या नावावरील किराणा दुकानही फसवून ताब्यात घेतले. पित्याकडे राहिलेला फ्लॅट बळकविण्यासाठी आता त्यांना मारहाण सुरू आहे. ही घटना उपनगरातील कॉटेज कॉर्नर भागातील गणांत अपार्टमेंटमध्ये घडली. या माजी सैनिकाने या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मुलगा, सून आणि सासरवाडीकडील चौघांविरुद्ध फसवणूक, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सैनिक दांम्पत्यावर उपासमारीची वेळ

सर्जेराव नामदेव काळे (वय ५७) हे भारतील लष्करात १९८५ मध्ये दाखल झाले. त्यांनतर त्यांनी २००१ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. कॉटेज कॉर्नर येथे प्लॅट घेतला. या ठिकाणी किराणा दुकान सुरू केले. व्यावसायात चांगली प्रगती झाली. त्या उत्पन्नातून गणांत अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला. पत्नी आजारी असल्याने मुलगा अभिषेकचे वयाच्या १८ व्या वर्षीच उज्ज्वला बारस्कर हिच्याशी लग्न लावले. या लग्नानंतर मुलगा आणि सून यांनी त्रास देण्यास सुरूवात केली. मुलगा आणि सुनेने किराणा व्यावसाय स्वतःच्या नावावर करून घेतला. तसेच गणांत अपार्टमेंटमधील फ्लॅटही नावावर करून देण्याची मागणी केली. संबंध सुधारतील, या आशेवर २०१९ मध्ये ही जागा काळे यांनी त्यांच्या नावावर खरेदी करून दिली.

गुन्हा दाखल

दुय्यम उपनिबंधक कार्यालयात खरेदीखतापोटी मुलाने दिलेला धनादेश खात्यावर वटविला नाही. फ्लॅट आणि किराणा दुकान बळकविल्यानंतर राहिलेला बंगला बळकविण्यासाठी आता त्यांना त्रास दिला जात आहे. मुलगा, सून, आणि मुलाच्या सासरवाडीवरील नातेवाईक त्यासाठी मारहाण करून दमबाजी करत आहेत, अशी फिर्याद त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. मुलगा, सून आणि मुलाच्या सासरवाडीकडील चौघे अशा सहा जणांविरोधात फसवणूक करणे, मारहाण करणे, धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वत:च्या कमाविलेली प्रॉपर्टी परत मिळावी. मुलाने फसवणूक केली असून त्यासाठी कुठलीही रक्कम मिळालेली नाही. तसे पुरावेही आहेत. मला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे.

- सर्जेराव काळे, निवृत्त सैनिक नगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT