शिक्षक sakal
अहिल्यानगर

पगार एकाचा, कामे होतात दुसरीच; अध्यापन सोडून गुरुजींचे उद्योग

दौलत झावरे


अहमदनगर : आपला आर्थिक स्तर उंचावावा, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. सध्या अशीच धडपड जिल्ह्यातील काही शिक्षकांकडून सुरू आहे. अध्यापनाकडे दुर्लक्ष करून काही जण प्लॉटिंग, विमा व हातउसने पैसे देऊन त्याची वसुली, यातच धन्यता मानत असल्याने, आता ‘गुरुजी, अध्यापनाकडे बघा’ असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे.


जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या पाच हजार ३०२ शाळा आहेत. त्यांत सुमारे ३२ हजार ५२० शिक्षक अध्यापनाचे काम करतात. यामध्ये पती-पत्नी व एकल शिक्षकांचा समावेश आहे. मात्र, काही शिक्षकांनी नोकरीतून मिळणाऱ्या पगाराबरोबरच विमा, प्लॉटिंग, सोयरीक जुळवणे, हातउसने पैसे देणे, असे उद्योग सुरू केले आहेत. हे व्यवहार संबंधितांकडून पत्नी, मुले व मेहुण्यांच्या नावांवर सुरू आहेत.


सध्या कोरोनामुळे शाळा ऑनलाइन सुरू असल्याने, हे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामध्ये विमा व हातउसने पैसे देण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यासाठी काहींनी व्यावसायिक व सर्वसामान्यांना गळाला लावले आहे. हातउसने पैसे देतानाची टक्केवारी वाढली असून, वसुलीसाठी काही वेळा दमबाजीचे प्रकार काही ठिकाणी घडू लागले आहेत. काही शिक्षकांच्या या उद्योगामुळे सर्वसामान्य शिक्षकांना त्रास सहन करावा लागत असून, ते नाराजी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, शिक्षकांनी अध्यापनाबरोबर गावाकडील शेती फुलवली, तर त्याचा समाजात एक चांगला संदेश जाऊन, शेतीमध्ये अनेक विकासकामे होऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांनी प्लॉटिंग, विम्यासह इतर कामांत लक्ष देण्याऐवजी शेतीकडे कल वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


शिक्षकांनी अध्यापन सोडून प्लॉटिंग, विम्याची कामे करणे चुकीचे आहे. सध्या काही जण हातउसने पैसे देऊन व्याजाचा व्यवसाय करू लागल्याच्या तक्रारी कानावर येत आहेत. असे प्रकार त्वरित थांबविण्यात यावेत.
- जालिंदर वाकचौरे, सदस्य, शिक्षण समिती, जिल्हा परिषद.

शिक्षक आपल्या कौशल्याचा उपयोग करून उत्पन्न वाढवत असेल, तर त्यात गैर काही नाही. शाळा सोडून कोणीही असे उद्योग करत नाही. उलट फावला वेळ कारणी लागतो. असे अनेक शिक्षक, शाळा व मुलांसाठी स्वतःचा अतिरिक्त पैसा खर्च करीत असतात. उलट ही सकारात्मक बाब आहे.
- डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते

नियमबाह्य कामे कोणी करीत असतील, तसेच पुराव्यानिशी तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT