sai temple in shirdi will open for devotees on 7th october sai temple in shirdi will open for devotees
अहिल्यानगर

खूशखबर! घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुला होणार साईंचा दरबार

सतिश वैजापूरकर

शिर्डी (जि. अहमदनगर) : देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साईसमाधी मंदिर सात आक्टोबर रोजी दर्शनासाठी खुले होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाविकांसाठी दर्शन, निवास व भोजन व्यवस्थेचे नियोजन करण्याकरिता आज (गुरुवारी) पहिली बैठक साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांच्या उपस्थितीत पार पडली. कोविड नियमांचे पालन, रेल्वे व विमानतळावर कोविड चाचण्यांची व्यवस्था, तसेच स्थानिकांच्या कोविड लसीकरणास वेग देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.


साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलिस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक सुनील श्रीवास्तव, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के आदी उपस्थित होते.

प्रांताधिकारी शिंदे म्हणाले, कीसाईमंदिर खुले झाल्यानंतर कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. तालुक्यात अद्यापही रुग्णसंख्या वाढती आहे. रेल्वे व विमानतळावर भाविकांची कोविड चाचणी केली जावी. त्यासाठी व्यवस्था उभी करावी लागेल. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रसादालय, धर्मशाळा व दर्शनबारीच्या सफाईचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपंचायत, साईसंस्थान व पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून भिकारी हटाव मोहीम हाती घेतली जाईल.



दर्शनबारीतील भाविकांची कोविड चाचणी

दैनंदिन बारा ते तेरा हजार भाविकांना साईदर्शन देण्याची व्यवस्था करता येते. टप्प्याटप्प्याने ही संख्या अठ्ठावीस हजारांपर्यंत वाढविता येते, असा साईसंस्थानचा पूर्वानुभव आहे. दर्शनबारीतील चाळीस ते पन्नास भाविकांच्या कोविड चाचण्या करून कोविड संसर्ग फैलावाचा अंदाज घेतला जाईल. त्यादृष्टीने नियोजन केले असल्याची माहिती साईसंस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

आगामी सात ऑक्टोबर रोजी साईमंदिर खुले होईल. पहिल्याच दिवशी स्पाईस जेटची प्रवासी विमानसेवा सुरू होईल. ज्या शेतकरी व व्यापाऱ्यांना विविध महानगरांत कार्गो सेवेद्वारे आपला शेतमाल पाठवायचा आहे, त्यांनी संपर्क साधावा.
- कृष्णा शिंदे, व्यवस्थापक, स्पाईस जेट कार्गो सेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टरांचे चुकीचे उपचार अन् शरीरभर इन्फेक्शन; थोडक्यात वाचली CID फेम मराठी अभिनेत्री "म्हणून मुलाला जन्म.."

शेवटी त्यांचे सीन बसूनच व्हायचे... 'आई कुठे काय करते' करताना अशी झालेली कांचन आजींची अवस्था; मिलिंद गवळींचा खुलासा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; २१०० रुपये कधीपासून मिळणार?

Latest Marathi News Live Update : 25000 रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Railway recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!, ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

SCROLL FOR NEXT