amc nagar 
अहिल्यानगर

"ते' काम तर महापालिकेच्या खर्चातून - बोरकर 

अमित आवारी

नगर : प्रत्येक पावसाळ्यात तांबटकर मळा, गणेश कॉलनी, परिजात चौक परिसरात पावसाचे पाणी नागरीवसाहतींमध्ये घुसते. गेल्या 10 ते 15 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. त्यानंतर आयुक्तांना आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेने तातडीने या परिसरातील कामे हाती घेतले. त्यामुळे दळवी मळा, गणेश कॉलनी, पारिजात चौक परिसरातील सफासफाई व दुरूस्तीची कामेही महापालिकेनेच्या निधीतून झाली असून कोणीही स्वखर्चातून कोणीही केली नाही. त्यामुळे नागरिकांची कोणीही दिशाभूल करू नये असे माजी नगरसेवक अजिंक्‍य बोरकर यांनी म्हटले आहे. 

परिजात चौक, दळवी मळा, नरहरी नगर, गणेश कॉलनी, मधुबन कॉलनी, कोहिनूर मंगल कार्यालय परिसर, गुलमोहर रस्ता परिसरातील वसाहतीमध्ये प्रत्येक पावसाळ्यात नागरी वसाहतीमध्ये पाणी शिरते. याबाबत आम्ही जानेवारी महिन्यात महापालिकेला याबाबत लेखी कळविले होते. मात्र महापालिकेने आमच्यापत्राकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आम्ही पाठपुरवा देखील सुरूच ठेवला होता. मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यानंतर आम्ही थेट आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी, जेसीबी व कर्मचाऱ्यांनी परिजात चौक, दळवी मळा, नरहरी नगर, गणेश कॉलनी, मधुबन कॉलनी, कोहिनूर मंगल कार्यालय परिसर, गुलमोहर रस्ता परिसरातील सफसफाईचे काम हाती घेतले. महापालिकेने सुरू केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा काही जणांनकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र दळवी मळा, गणेश कॉलनी, परिजात चौक येथील साफसफाईचे काम महापालिकेच्या निधीतून झाले असून कोणीही स्वखर्चाने केला नसल्याचे बोरकर यांनी सांगितले. 

नगर महापालिकेने अनेक वर्षांपासून नैसर्गिक ओढे-नाले गायब केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास होत आहे. दळवीमळा येथे मी जेसीबी लावून काम करून घेतल्यानंतर महापालिकेने जेसीबी उपलब्ध करून दिला. त्यानंतर इतर ठिकाणी काम करण्यात आले. महापालिका आयुक्‍तांनी चौकशी करून ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हे ओढे-नाले गायब झाले त्यांच्यावर कारवाई करावी. 
- योगीराज गाडे, नगरसेवक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

SCROLL FOR NEXT