Robbery of two lakh rupees at Bhenda
Robbery of two lakh rupees at Bhenda 
अहमदनगर

भेंड्यात दोन लाखांची लूट, पोलिसांना वाटतोय बनाव

सकाळ वृत्तसेवा
नेवासे : तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे नेवासे-शेवगाव रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने पिकप जीपला दुचाकी आडवी लावून दोन लाख रुपयांची लूट झाल्याची घटना मंगळवारी (ता,7) रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. 

या प्रकरणी वाहन चालकाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान लुटीचा घटनाक्रमावरून ही खरोखरच रस्ता लूट आहे की बनाव याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - पेच वाढला...पारनेरचे ते नगरसेवक म्हणतात

हरिदास सोपान आहेर (वय 48, रा.रामज पिंपळस,ता.निफाड, जिल्हा नाशिक) याने नेवासे पोलिसांत लुटल्याची फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस उपधीक्षक मंदार जवळे,पोलिस निरीक्षक रणजित डेरे,गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित वाहन चालकांची चौकशी करत आहेत. 

फिर्याद हरिददास आहेर हे बोलेरो पीकप (एम एच 15 पीव्ही 2680) या वहानाने लातूरहुन नाशिककडे जात असताना नेवासे तालुक्यातील भेंडे ब्रूद्रुक येथील माऊली दूध संकलन केंद्राजवळ नेवासे-शेवगाव मुख्य रडत्यावर आज मंगळवार (ता. 7) दुपारी साडेसाडे तिच्या सुमारास पिकअप अज्ञात व्यक्तीने दुचाकी आडवी लावून पिकअप थांबवून चालकाकडील रोख 2 लाख रुपये व ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेऊन पलायन केले आहे.आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

रस्तालूट की बनाव? 
रस्तालूटप्रकरणी वाहन चालक देत असलेली माहिती व घटनास्थळाची परिस्थिती पाहता या ठिकाणी मोठी लोकवस्ती आहे. त्यामुळे याठिकाणी रस्तालूट होण्याच्या शक्यतेबाबत नागरिकांसह पोलिसांनाही साशंकता आहे. पोलिसांचाही त्याच दिशेने तपास चालू आहे. मात्र खात्री करण्यासाठी पोलिसांनी भेंडे, कुकाणे येथील नेवासे-शेवगाव महामार्गावरील अनेक सीसीटीव्हीच्या तपासण्या करत आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीस याप्रकरणी तपास करत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT