akola west assembly constituency
akola west assembly constituency sakal
अकोला

Akola West Assembly Constituency : अकोला पश्चिममध्ये लालाजींच्या जागी कोण? उमेदवारीवरून ‘भाजपा’त दोन गट

योगेश फरपट

अकोला - लोकसभेचा उमेदवार भाजपाने निश्चित केला असला तरी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात नेमके कोणत्या उमेदवाराला उभे करायचे हा प्रश्न भाजपासमोर उभा ठाकला आहे. आमदारकीसाठी होत असलेल्या पोटननिवडणूकीसाठी इच्छूकांची संख्या जास्त असल्याने भाजपात दोन गट पडले आहेत.

उमेदवारीसाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीही इच्छा व्यक्त केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे लालाजींच्या जागी शर्मा कुटूंबातील व्यक्तीला तिकिट मिळते की दुसऱ्या एखाद्या योग्य उमेदवाराला तिकिट मिळते याकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचेही लक्ष लागले आहे.

गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. मागील सहा टर्मपासून लालाजी (गोवर्धन शर्मा) हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करित आले आहे. त्यामुळे त्यांच्या घरातच उमेदवारी द्यावी असा विचार भाजपाच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केल्यानंतर लालाजींचे सुपूत्र कृष्णा शर्मा यांनी तयारी दर्शवली.

मात्र यामुळे भाजपाच्या एका गटात तीव्र नाराजीचा सूर उमटला. त्यामुळे भाजपाने अकोला पश्चिमच्या उमेदवारीसाठी मुलाखती घेण्याचे ठरवले. अनेक वर्षापासून भाजपामध्ये निष्ठावान असलेले माजी महापौर विजय अग्रवाल, माजी आमदार गोवर्धन शर्मा यांचे सुपूत्र कृष्णा शर्मा, माजी नगरसेवक सिद्धार्थ शर्मा, माजी नगरसेवक हरिष आलिमचंदाणी, ॲड. मोतिसिंग मोहता, भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरिश जोशी, योगेश शाहू, डॉ. अशोक ओळंबे यांनी सुद्धा अकोला पश्चिममधून विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

दुसरीकडे काँग्रेसमध्येही उमेदवारीबाबत ठाम मत नसून साजिद खान पठाण, झिशान हुसेन, बबनराव चौधरी, डॉ. अभय पाटील, मदन भरगड, विवेक पारस्कर, अन्नपुर्णेश पाटील यांनी निवडणूकीसाठी तयारी दर्शवली असून प्रदेशाध्यक्षांकडे उमेदवारीसाठी साकडे घातले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारीणीकडून अकोला जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती स्फुर्ती गावंडे यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते निखिल गावंडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठांकडे पाठवला आहे. तर दिवंगत माजी नगरसेविका धनश्री देव यांचे पती नीलेश देव हे सुद्धा इंटरेस्टेड आहेत. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांनीही तयारी सुरु केली असून सोशल मीडियावर त्यांचे नाव झळकत आहे.

भाजपकडून मुलाखती

सोमवारी भाजपा पक्षश्रेष्ठींकडून अकोला पश्चिमसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. महाराष्ट्राचे सांस्कृतिक आघाडीचे प्रमुख डॉ. अनिल सोले व संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांनी जिल्हा व शहर भाजपाच्या १५ कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. पुढील दोन दिवसात अकोला पश्चिमसाठी उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT