girl atyachar 
अकोला

‘तुझ्या पतीचा अपघात झाला, माझ्यासोबत लवकर चल’ अन्...

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि. अकोला) : तालुक्यातील थार येथील रहिवासी असलेल्या २७ वर्षीय विवाहितेला पूर्वपरिचित वाहन चालकाने तुझ्या पतीचा अपघात झाला, माझ्यासोबत लवकर चला अशी बतावणी केली व पातूर रस्त्याने नेले. तिथे चाकूचा धाक दाखवून अब्रू लुटली व धमकी देऊन शूटिंग केली. काढलेल्या फोटोच्या आधारे बदनामीची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणमध्ये वायरमन म्हणून काम करणाऱ्या पतीसोबत अकोला येथे विवाहानंतर भाड्याच्या घरात राहायला गेलेल्या २७ वर्षीय विवाहितेशी भाड्याचे वाहनात सामान आणतेवेळी वाहनचालक राजकिरण हरिदास कांबळे (वय ३५, रा. विद्युत कॉलनी पारस, ता. बाळापूर) या इसमाची ओळख झाली. त्याने ओळखीचा गैरफायदा घेऊन एक दिवस विवाहितेच्या घरी जाऊन पतीचा अपघात झाल्याचे सांगून लवकर चला, असे सांगितले.

दुर्घटनेच्या बातमीने भयभीत झालेली विवाहिता स्वतःच्या मुलास नणंदेकडे ठेवून इसमावर विश्वास ठेवत त्याच्यासोबत वाहनात गेली. पातूर रस्त्याने चाकूचा धाक दाखवून त्याने वाहनातच तिच्यावर अत्याचार केला व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फोटो काढले व शूटिंग केली. कोणालाही ही बाब सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

भीतीपोटी महिलेने ही बाब पतीला सांगितली नाही. याचाच फायदा घेत आरोपीने २ मार्च २०२० ते २० सप्टेंबर २०२१ या कालावधीत विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. पीडिता तेल्हारा तालुक्यातील थार येथील रहिवासी असल्याने २० सप्टेंबर रोजी तेल्हारा पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. तेल्हारा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी राजकिरण हरिदास कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश कायंदे पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : महिला पोलिस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Crime : वारजे, मुंढवा परिसरात हातभट्टी अड्ड्यांवर छापे; विषारी रसायनांचा साठा जप्त

Latest Marathi News Live Update: महिला पोलिस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

गाव जगापासून वेगळं झालं अन् समोर आले डायनोसॉर! हॉलिवूडचा नवा थरार 'द एंड ऑफ ओक स्ट्रीट' लवकरच भेटीला

Katraj Ghat: कात्रज घाटात संरक्षक भिंती ढासळल्या; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

SCROLL FOR NEXT