Akola lok sabha election
Akola lok sabha election  sakal
अकोला

Lok Sabha Election : निवडणुकीत ९५ लाखांवर खर्च कराल तर खबरदार!

सकाळ वृत्तसेवा

Akola News : निवडणुकीत उमेदवारांकडून वारेमाप खर्च होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार उमेदवारांना लोकसभेसाठी ९५ लाख तर विधानसभेसाठी ४० लाख रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

याआधी लोकसभेसाठी ७० लाख तर विधानसभेसाठी २८ लाख एवढी खर्च मर्यादा होती, परंतु वाढलेली महागाई पाहता आयोगाने खर्चाच्या रकमेतही वाढ केली आहे. याव्यतिरिक्त लोकसभा निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरीता २५ हजार रुपये डिपॉझिट भरावे लागेल.

देशभरात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यात लोकसभेसह अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे.

त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी जिल्ह्यात सुरू झाली आहे. निवडणुकीत पैशाची होणाऱ्या उधळपट्टीला काही प्रमाणात ब्रेक लागावा यासाठी निवडणूक आयोगाने खर्चावर मर्यादा लावली आहे.

गत वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत खर्चाची मर्यादा वाढली असली तरी वाढलेल्या महागाईमुळे सुद्धा खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवावी अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा वाढवली आहे.

अनामत रक्कम भरणे उमेदवारांना अनिवार्य निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना अनामात रक्कम भरणा करणे अनिवार्य आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरीता २५ हजार, अ.जा, अ.ज प्रवर्गातील उमेदवारांकरता १२ हजार ५०० तर विधानसभेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरता १० हजार, अ.जा. अ.ज प्रवर्गातील उमेदवारांकरता पाच हजार रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

अनामात रक्कम ही रोख स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावे किंवा बँकेत मार्फत चलानद्वारे देखील भरणा करता

येईल.स्वतंत्र बँक खाते बंधनकारक लोकसभा व विधानसभा पोटनिवडणूक २०२४ निवडणुकीत भाग्य आजमावणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकांच्या खर्चासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी किमान एक दिवस अगोदर स्वातंत्र्य बँक खाते उघडणे बंधनकारक आहे.

त्वरित धनादेश पुस्तिका निर्गमित करणे, निवडणूक काळात स्वातंत्र्य काउंटर सुरू करणे, उमेदवारांना रकमा जमा करणे व काढण्याकरता प्राधान्य देण्यात आले असून तशा सूचना देखील जिल्हा अग्रणी बँक यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT