devendra fadnavis 
अकोला

NCP : गृहमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘तो’ नेता मोकाटच

सकाळ डिजिटल टीम

अकोला : एका शिक्षण संस्थेतील आदिवासी महिलेला नियमबाह्यरित्या सेवेतून काढून टाकल्याबद्दल ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला संस्था अध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेता यांच्याविरोधात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतरही फरार आहे.

खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर विधिमंडळ परिसरात फिरताना दिसलेल्या या नेत्यावर कारवाईचे आदेश गृहमंत्र्यांनी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले होते.

कौलखेड परिसरातील खेताननगरात असलेल्या श्रीराम मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एका आदिवासी शिक्षिकेला शाळेचे संस्थाचालक अध्यक्ष, मुख्याध्यापक यांच्याकडून नाहक त्रास देवून मानसिक झळ करण्यात येत असल्याची लक्षवेधी विधान परिषदेत आमश्या पाडवी यांनी लावली होती.


१८ वर्षांपासून शिक्षिका असलेल्या या महिलेच्या विरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणतेही आदेश दिले नव्हते. त्यानंतर हे प्रकरण विभागीय स्तरावर प्रलंबित असतानाच शिक्षिकेला शाळा समितीच्या अहवालावरून सेवेतून काढण्यात आले होते.

या प्रकरणात महिलेने खदान पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड व मुख्याध्यापकासह अन्य दोघांवर ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतरही विधिमंडळाच्या परिसरात फिरताना आढळल्यामुळे गृहमंत्र्यांनी या नेत्याला अटक करण्यासंदर्भातील आदेश अकोला पोलिसांना दिले होते. आधी तर गुन्हा दाखल करण्यासाठीच विलंब केला आणि आता अटक करण्यासाठीही विलंब करून पोलिस या नेत्याला पाठिशी तर घालत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT